Ajit Pawar Statements Recent Leaders No longer worthy : दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला होता. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. त्यानंतर आज देखील पुन्हा अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी बोलताना अजितदादांनी कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय. त्यांनी म्हटलंय की, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही, त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका.
ईद मुबारक! मुस्लिम बांधवांना भाजपकडून ‘सौगत-ए-मोदी’, जाणून घ्या सविस्तर
माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झालाय. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन (NCP Politics) केलंय. मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ देखील त्यांनी यावेळी दिलाय. सोबतच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं. राजकीय नेत्यांबद्दलची जनतेमध्ये असलेली अनास्था यावेळी अजित पवारांच्या तोंडी पाहायला मिळाली.
अजित पवार म्हणाले की, अलीकडे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाहीये, त्यामुळे त्यांच्या पाया पडायच्या नादामध्ये पडू नका. चंद्रकांत दायमा यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करत असून राजेश विटेकर संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज केंद्रात स्थिर सरकार आलंय. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. काम करताना पारदर्शक भूमिका घेतली पाहिजे, असं देखील यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय.
उद्या जर आपला माणूस चुकला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आहे. कोणीही सुटणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. जे आपण भाषणामध्ये सांगू ते कृतीमध्ये आलं पाहिजे. आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत. सगळेजण सारखे आहेत, असं समजून आपण काम करू. पाया पडायच्या नादामध्ये पडू नका, अलीकडचे पुढारी त्या लायकीचे राहिलेले नाही असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे.