Download App

Ajit Pawar : अजितदादांची नवी खेळी! काका, बहिण अन् कोल्हेंना वगळलं तर, पवारांच्या जवळील व्यक्ती टार्गेट

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून बाहेर पडले. तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांमध्ये कोणत्याना कोणत्या मुद्द्यावरून वाद समोर येत आहेत. त्यात आता अजित पवारांनी एक नवी खेळी खेळली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांचे काका आणि बहिण स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार अमोल कोल्हे यांना वगळून पवारांच्या जवळच्या व्यक्तींना टार्गेट करायला सुरूवात केली आहे.

पवारांच्या जवळील व्यक्तींना टार्गेट करायला सुरूवात…

अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार गटाने केली. त्याला प्रत्युत्तर देत आता अजित पवार गटाने देखील शरद पवार गटाच्या काही खासदारांची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे. मात्र यामध्ये एक संभ्रमात टाकणारी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. कारण यामध्ये राज्यसभेमधील शरद पवार आणि लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळून इतरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Jau Bai Gavat: करणार तेव्हा कळणार! ‘जाऊ बाई गावात’ 6 स्पर्धकांची नाव जाहीर

तर या पत्रामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शरद पवार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये राज्यसभेतील वंदना चव्हाण आणि फौजिया खान, तर लोकसभेतील श्रीनिवास पाटील आणि फैजल मोहम्मद यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे जर विरोधच करायचा असेल तर अजित पवार आणि त्यांचा गट थेट पवार कुटुंबाविरोधात भुमिका घेत नसल्याचं दिसत आहे.

Manoj Jarange : …तर भुजबळांची राजकीय पोळी कशी भाजणार? जरांगेंनी भुजबळांना पुन्हा डिवचलं

दरम्यान शिंदे गटाने देखील अशीच भूमिका घेतली होती. ठाकरे कुटुंबाविरोधात कारवाईची मागणी न करता इतरांना विरोध केला होता. त्यात आता त्याच पावलावर पाऊल हे अजित पवार गटाने घेतलं आहे. त्याचबरोबर शरद पवार गटात असलेले खासदार अमोल कोल्हे हे खरे नेमक्या कोणत्या गटात आहेत याचा संभ्रम कायम आहे. कारण त्यांनी दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दिलं आहे.

शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट घेतली. चार महिन्यांपूर्वी पक्षविरोधी कारवायांसाठी दहाव्या अनुसूचीनुसार कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोणतीही कार्यवाही न झाल्याने शरद पवार गटाने ही भेट घेतल्याचे मानले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा या शिष्टमंडळात सहभागी होता.

follow us