Ajit Pawar यांची गोविंदबागेत अनुपस्थिती, सुप्रिया सुळेंनंतर पवारांचंही स्पष्टीकरण, म्हणाले…

Ajit Pawar यांची गोविंदबागेत अनुपस्थिती, सुप्रिया सुळेंनंतर पवारांचंही स्पष्टीकरण, म्हणाले…

Ajit Pawar : गेल्या कित्येक वर्षांपासून परंपरा असलेल्या गोविंदबागेतील दिवाळीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधान आले होते. त्या अगोदर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं होतं त्यात आता स्वतः शरद पवारांनी देखील अजित पवारांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिलं आहे.

खासदार अमोल कोल्हे- दिलीप वळसे पाटील यांची भेट; काय आहे नेमकं भेटीचे कारण?

काय म्हणाले शरद पवार?

दरवर्षी प्रमाणे गोविंदबागेत सकाळपासून शरद पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते. तेथे सुप्रिया सुळे देखील होत्या. मात्र अजित पवार नव्हते. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आजारपणामुळे कोणी आले नसेल तर गैरसमज करून घ्यायला नको. काही कामे असतात. काहींचा दौरा सुरू आहे. कोणी आजारी आहे. व्यक्तिगत दुखणे आहेत. त्यामुळे कोणी आले नसेल तर गैरसमज नको असं म्हणत स्वतः शरद पवारांनी देखील अजित पवारांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिलं आहे.

…म्हणून अजित पवार गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर

अजित पवार हे गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिले आहेत. ते गैरहजर का होते? याचं कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या तर या दिवाळी कार्यक्रमाला दादा येऊ शकला नाही कारण त्याला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या 20-25 दिवसांपासून तो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेला नाही. त्यामुळे तो आजच्या गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिला आहे. तसेच तो नसला तरी रणजित पवार आणि माझे इतर भाऊ आहेत. जे आहे ते मानाने स्विकारलं पाहिजे. असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं आहे.

Box office collection: भाईजानच्या ‘टायगर 3’ने मोडला किंग खानच्या ‘जवान’चा रेकॉर्ड

दरम्यान मात्र यावर्षी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे अजित पवार या दिवाळीला गोविंदबागेत हजर राहणार का? अशा चर्चा सुरू होत्या. त्यात शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रतापराव पवार यांच्या निवास्थानी भेट घेतल्याने अजित पवार दिवाळीला गोविंदबागेत असंही बोललं जात होतं मात्र दिवाळीनिमित्त भेट होऊनही अजित पवार हे गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube