Download App

पार्थ पवार यांना थेट ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा! मात्र, सुरक्षा देण्याचं कारण काय?

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Parth Pawar Y+ Security : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार यांना आता वाय दर्जाची सुरक्षा असणार आहे. राज्य सरकारकडून चार दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यातआला आहे. परंतु, अशी कुठली घटना घडली की, पार्थ पवार (Parth Pawar) यांना थेट ‘वाय प्ल’ दर्जाची सुरक्षा देण्याची गरज भासली हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे. बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. मात्र, त्या मतदारसंघात असं काय घडलं की पार्थ यांना सुरक्षा द्यावी लागली? हा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.

नामदेव जाधव, म्हणतात मला शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालाय… बारामती लोकसभा लढणार

सुप्रिया सुळेंना 35 लाखांचा तर अजित पवारांना दिलंय 63 लाखांचा कर्ज, सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती?

 

मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मतांनी पराभूत

बारामती लोकसभेची निवडणूक यंदा फक्त दोन राजकीय पक्षात होत नसून, ती दो कुटुंबात लढत होत आहे असं चित्र आहे. गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चुलते-पुतणे यावेळी एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यामध्ये कुटुंबातही मोठी फूर पडल्याचं यामध्ये दिसून येत आहे. अजित पवार यांचे दोन्ही बंधू सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. तसंच, आमदार रोहित पवारही सुप्रिया यांना चांगली साथ देत आहेत. दरम्यान, गेल्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मतांनी पराभूत झालेले पार्थ पवार यंदा आपल्या आई सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार करत आहेत.

 

युगेंद्र पवार यांनाही सुरक्षा देण्याची केली होती मागणी

लोकसभा निवडणूक सुरू असल्याने अनेक महत्वाच्या व्यक्तिंची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. मात्र, पार्थ पवार यांना अचानक सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, पार्थ यांचे चुलत बंधू युगेंद्र पवार यांना काही दिवसांपुर्वी लोकांनी घेराव घातला होता. त्यानंतर त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

follow us

वेब स्टोरीज