Download App

अमित शहांनी पवारांना मागितला हिशोब! म्हणाले, तुम्ही ‘त्या’ 10 वर्षात किती…

  • Written By: Last Updated:

Amit Shah : राज्यातील नेत्यांसह भाजपचे केंद्रीय नेत्यांनीही महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळी ‘400 पार‘चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी अनुप धोत्रे यांना आपण विजयी करा असं आवाहन केल आहे. तसंच, शाह यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) जोरदार हमला केला आहे. ते अकोल्यात प्रचार सभेत बोलत होते.

 

र्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचा दावा

यावेळी बोताना, अमित शाह यांनी काँग्रेसवरही काही आरोप केले. ते म्हणाले, काँग्रेसने भारताची अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावर ठेवली होती असा थेट आरोप केला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचा दावाही शाह यानी यावेळी केला आहे. त्याचबरोबर आपण नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा त्यानंतर अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिलं आहे. तसंच, मोदी यांनी काश्मीरचं 370 कलम हटवल याचा उल्लेख यावेळी केला.

Akola Loksabha : शरद पवारांचं एक वाक्य अन् प्रकाश आंबेडकरांचा मार्ग मोकळा?

10 वर्षाच्या कार्यकाळात काय मिळालं

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. शाह म्हणाले, मला शरद पवारांना प्रश्न विचारायचा आहे असं म्हणताच शाह यांनी उद्धव ठाकरेंना काही विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावत शाह पुढे म्हणाले मला शरद पवारांना विचारायचं आहे की, तुम्ही 10 वर्षे काँग्रेसच्या केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री होता. या 10 वर्षाच्या कार्यकाळात सोनिया-मनमोहन सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी किती पैसे दिले? असा थेट प्रश्न शाह यांनी पवारांना केला आहे.

 

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

सभास्थळी पावसाचं जोरदार आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अकोल्यात सभास्थळी ज्या वेळेत आगमन होणार होते त्यावेक्षा थोड उशिरा झालं. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊस काही थांबत नसल्याने अमित शाह यांचं हेलिकॉप्टर पोहोचण्यासही जास्तच उशीर झाला. जेथे अमित शाहंची सभा होती तेथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शाहांच्या सभेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांचीही मोठी तारांबळ उडाली.

 

follow us