मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कसमोरील महापौर बंगल्यात हिंदूहृदयसम्राट-शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. हे दोन्ही नेते एकत्र येण्याच्या चर्चांना जोर धरला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर थेट भूमिका मांडली आहे. (Amey Khopkar On Uddhav Thackeray and Raj Thackeray yuti)
शिवेसेनेत फुट पडल्यापासून उबाठा आणि मसने एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आताही हे ही चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या विषयावर अमेय खोपकर म्हणाले, ‘सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करतो की मी मनसेचा सरचिटणीस म्हणून माझी भूमिका मांडत आहे. ही पक्षाची अधिकृत भूमिका नक्कीच नाही. मनसेचा कार्यकर्ता या नात्याने माझं वैयक्तिक मत आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांना कोणतीही अडचण आली तर दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होते. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत येतात. तेव्हाच अशा चर्चा का होतात? असं खोपकर म्हणाले.
मणिपूर हिंसाचार ते डेटा प्रोटेक्शन विधेयक; आंबेडकरांचे राहुल गांधींना सात खोचक सवाल…
ते म्हणाले, दोन्ही भावांनी एकत्र येण्याची गरज नाही असे मला वाटते. राजकीयदृष्ट्या दोन भावांनी एकत्र येण्याची गरज नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण गेल्या 17-18 वर्षांत त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला (मनसे) त्रास दिला. त्यावेळी तुम्हाला या गोष्टी आठवल्या नाहीत का? राज ठाकरेंच्या घरातील व्यक्ती आजारी होती, तेव्हा त्यांनी आमचे सहा नगरसेवक चोरले. तेव्हा तुम्हाला शरम वाटली नाही का, असा सवालही खोपकर यांनी केला.
तर उबाठाचे खासदरा संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदे घेत सूचक वक्तव्य केलं होतं. दोन भाऊ एकमेकांना कधीही भेट शकता. चर्चा करू शकतात, तिसऱ्या माणसाला यात पडण्याची गरज नाही, असं ते म्हणाले होते, त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधूंची युती युती होणार असल्याचं बोलल्या जातं आहे.
खरंतर मुंबई आणि मराठी अस्मितेसाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, अशी जनभावना आहे. पण राज ठाकरेंनी मनसेचा झेंडा बदलला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली होती, मशिदींवरील भोंगीविरोधात मनसे रस्त्यावर उतरली. त्यामुळे मनसे भाजपच्या जवळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र मनसेनं अद्याप भाजपशी युती केली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत जाणार की उबाठासोबत जाणार, हेच पाहणं महत्वाचं आहे