मणिपूर हिंसाचार ते डेटा प्रोटेक्शन विधेयक; आंबेडकरांचे राहुल गांधींना सात खोचक सवाल…

मणिपूर हिंसाचार ते डेटा प्रोटेक्शन विधेयक; आंबेडकरांचे राहुल गांधींना सात खोचक सवाल…

Prakash Ambedkar News : काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा खासदाराकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिसून आले आहेत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने महत्वपूर्ण विधेयके मंजूर केली आहेत. केंद्र सरकारच्या विधेयक मंजूरीसह इतर मुद्द्यांवर बोट ठेवत वंचितचे प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधींना सात खोचक सवाल केले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. (7 questions asked prakash ambedkar to rahul gandhi on various-topics)

ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मणिपूर हिंसाचार, डेटा प्रोटेक्शन, दिल्ली सेवा विधेयक,
कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती जमाती उपयोजना निधी वळवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत सवाल केले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भूमिका, मैला वाहून नेण्याची प्रथा संपुष्टात आली आहे, याचा दोन्ही सभागृहात वारंवार पुनरुच्चार होतं असल्याचं निदर्शनास आणून देत या प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे.

काँग्रेसने कसली कंबर! लोकसभेच्या 48 मतदारसंघासाठी शिलेदार मैदानात

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. संसदेच्या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे केंद्र सरकारने दिल्ली सेवा विधेयक आणि डेटा प्रोटेक्शन विधेयक मंजूर केले तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यांना खासदारकी बहाल करण्यात आलीयं. त्यानंतर राहुल गांधी संसदेच्या अधिवेशनात दिसून आले आहेत. त्यावरुन आता प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना हे सात खोचक प्रश्न विचारले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट करुन ‘जवाब देना होगा’ असं कॅप्शनही दिलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांना खासदारकी मिळाल्यानंतर शासकीय निवासस्थानही देण्यात आलं असून संपूर्ण भारतच माझं घर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी देशभरात पदयात्रा काढणार असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ च्या भूमिकेवर बोट ठेवत आंबेडकरांनी सवाल केले आहेत. राहुल गांधी या प्रश्नांवर काय भूमिका स्पष्ट करतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube