Download App

‘अमित अन् धीरज देशमुख जिथं तिथं मी’; पक्षांतराच्या वावड्यांवर विश्वजित कदमांचा शब्द

Vishwajeet kadam : जिथं अमित, धीरज देशमुख तिथं विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) खंबीरपणे उभं राहणार असल्याचा शब्दच आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधून अनेक आमदार भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. त्यावरुन विश्वजीत कदमांनी थेट उत्तरच दिलं आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Navjyot Singh Sidhhu : लोकसभेपूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका, तीन आमदारांसह सिद्धू भाजपमध्ये जाणार?

विश्वजीत कदम म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना झाली होती, त्यावेळी काँग्रेसचे पोलादी पुरुष म्हणून विलासराव देशमुख पुढे आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. काँग्रेस जेव्हा अडचणीत येतो तेव्हा विलासराव देशमुखांची आठवण होते. 2014 ला विलासराव हयात असते तर काँग्रेसची सत्ता गेली नसती हे ठामपणे सांगतो तसेच विलासराव असते तर पक्ष फोडण्याची कोणाचीही हिम्मत झाली नसती, असंही कदमांनी स्पष्ट केलं आहे.

‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वीच तिसऱ्या भागाची घोषणा; अल्लू अर्जुनने स्वतःच केला खुलासा

सध्या विलासराव देशमुकांचा राजकीय वारसा अमित, धीरज देशमुख सांभाळत आहेत. धीरज देशमुख तरुण आमदार म्हणून विधी मंडळात काम करत आहात. रितेश यांनी तर देशभरात नावलौकितक केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाल्यानंतर विलासरावांसोबत रणजित पाटील, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम ही मंडळी होती, अमितजी तुम्ही अशी टीम करा विश्वजीत कदम तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं विश्वजीत कदमांनी ठणकावूनच सांगितलं आहे.

जुन्या साथीदाराकडून अखिलेश यादवांचा गेम : संजय सेठ यांची राज्यसभेच्या रणांगणात भाजपकडून ऐनवेळी एन्ट्री

राजकारणात सध्या जे काही चाललं ते पाहुन खचून जाऊ नका, वावड्या उठवल्या जातात. या अफवा उठवणारे कोण आहेत हे आम्हाला अमितभैय्यांना आम्हाला चांगल माहित आहे, पण जिथं अमित भैय्या, बंटी पाटील आहेत तिथं विश्वजीत कदम आहे, त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभं रहावं, पुढील जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडणार असल्याचा शब्द विश्वजीत कदमांनी दिला आहे.

youtube.com/watch?v=SZWfkFrAIUo

दरम्यान, काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी नूकताच भाजपात प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतरही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचा एकही आमदार भाजपात गेला नाही. त्यामुळे वावड्या आणि अफवांवर विश्वास न ठेवता पक्षाला बळ देण्याचा आवाहनही विश्वजीत कदम यांनी केलं आहे.

follow us