तातडीने भाजप प्रवेश, घाईत पीडब्ल्यूडीची एनओसी : अशोक चव्हाणांची राज्यसभेसाठी लगबग

तातडीने भाजप प्रवेश, घाईत पीडब्ल्यूडीची एनओसी : अशोक चव्हाणांची राज्यसभेसाठी लगबग

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. चव्हाणांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर आज (13 फेब्रुवारी) त्यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यानंतर आता चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली असून कागदपत्रांचीही जुळवाजुळव सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण यांचा आधी 15 फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार होता. पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ते आग्रही होते. मात्र भाजपमधील एका बड्या नेत्याने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. त्यानंतर चव्हाण यांना एक राज्यसभेची उमेदवारी आणि घरात एक विधानसभेची उमेदवारी देण्याचे मान्य झाले. चव्हाण यांनीही या प्रस्तावाला संमती दर्शविली. 15 फेब्रुवारी हा राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने अशोक चव्हाण यांनी लगबगीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. (Former Chief Minister, senior leader Ashok Chavan is likely to be announced as a candidate for the Rajya Sabha by the BJP.)

दॅट चॅप्टर इज ओव्हर; राहुल गांधी अन् वरिष्ठांचे नाव घेताच अशोक चव्हाणांची बोलकी प्रतिक्रिया

याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी काल (12 फेब्रुवारी) काँग्रेस सोडताच रविभवन / नाग भवनसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मागणी केली. 12 हजार 300 रुपयांची थकबाकी लगेच भरली. पीडब्ल्यूडीनेही घाईघाईने सोमवारी सायंकाळीच एनओसी जारी केली. साधारणपणे खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी रविभवनची एनओसी आवश्यक असते. उमेदवारी अर्जासोबत त्यांना येथेही एनओसी द्यावी लागते. त्यानंतर (13 फेब्रुवारी) तातडीने छोटेखानी समारंभात भाजपात प्रवेश उरकून घेतला. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

चांगले बदलच दिसत नव्हते, किती कोंडी होऊ द्यायची? अशोक चव्हाणांचा खरा राग नाना पटोलेंवरच!

चव्हाणांसोबत कोण कोण?

काँग्रेस पक्षाच्या सदसत्वाचा आणि आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांसोबत असणाऱ्या काही काही नेत्यांची नावे समोर आली आहे. यात मुंबईतील दोन नावे असून, अमीन पटेल, अस्लम शेख, सुलभा खोडके, विश्वजीत कदम, माधव जवळकर, जितेश अंतापूरकर, अमित झनक, अमर राजूरकर आणि हिरामण खोसकर हे देखील चव्हाणांची साथ देत राजीनाम देणार असल्याचे सांगितले जात आहे. वरील नावांशिवाय माजी मंत्री डी.पी. सावंत आणि माजी खासदार खतगावर हेदेखील चव्हाणांसोबत असल्याचे सांगितले जात आहे. या नेत्यांनी आता राजीनामा दिला नसला तरी भविष्यात ते चव्हाण यांच्यासोबत जातील असे सांगितले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज