Site icon Letsupp | मराठी बातम्या, ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज | Marathi News Online

Loksabha Election : खऱ्या शिवसेनेचे अध्यक्ष असाल तर…; अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना चॅलेज

Amit Shah Ratnagiri Sabha

Amit Shah Ratnagiri Sabha

Amit Shah Ratnagiri Sabha : अयोध्येत राम मंदिर (Ram temple) बांधण्यासाठी तुम्ही मोदीजींना दुसऱ्यांदा निवडून दिलं. मात्र, काँग्रेसने (Congress) राम मंदिर रोखलं आणि आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. ठाकरेंची शिवसेना खरी असेल तर त्यांनी मुंबईत सभा घेऊन सांगावं की, अयोध्येत राम मंदिर झालं ते चांगलं झालं. पण ते सांगणार नाहीत. कारण, आता त्यांची व्होट बॅंक ही कॉंग्रेसची व्होट बॅंक आहे, ठाकरे हे नकली सेनेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Shirdi Lok Sabha : उत्कर्षा रुपवतेंचा झंझावाती प्रचार; लोखंडे, वाकचौरे यांना टेन्शन 

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा झाली. या सभेला उदय सामंत, दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, शेखर निकम, चित्रा वाघ, निलेश राणे, किरण सावंत, सदानंद चव्हाण, शिल्पा पटवर्धन आदी नेते उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना शाह म्हणाले, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असून उद्धव ठाकरे हे नकली सेनेचे अध्यक्ष आहेत. आज नकली सेनेचे अध्यक्ष आपल्या भाषणात वीर सावरकरांचं नाव घेऊ शकत नाही. सावरकरांचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. त्यांच्यात सावरकराचं नाव घ्यायची हिंमत नाही. कारण ते नकली सेनेचे अध्यक्ष आहेत, अशी टीका शाह यांनी केली.

पुढं ते म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. आणि याच कॉंग्रेसने कायम कलम 370 ला विरोध केला. जे मुख्यमंत्रीपदासाठी शदर पवार आणि राहुल गांधींना शरण जातात, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, असंही शाह म्हणाले.

पोल्का डॉट्स ड्रेसमध्ये खुललं सनीचं सौंदर्य, पाहा खास फोटो… 

मुंबईत सभा घेऊन उद्धव ठाकरेंनी सांगावं की, अयोध्येत राम मंदिर झालं ते चांगलं झालं. पण ते सांगणार नाहीत. कारण, तुम्ही त्यांची व्होट बॅंक नाही आहात. त्यांची व्होट बॅंक ही कॉंग्रेसची व्होट बॅंक आहे, असंही शाह म्हणाले.

यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, दहा वर्षाआधी देशात सोनिया-मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. कॉंग्रेसच्या काळात पाकिस्तान दहशतवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करायचे. मात्र, मौनीबाब मौन लावून असायचे. कारण त्यांना व्होट बॅंकेची चिंता होती, अशी टीका त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर केली.

Exit mobile version