Download App

अमित शहांचे ‘चॅलेंज’; पवारांना घेरण्यासाठी मोहोळांनीही हात उंचावून थोपटले दंड

अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत 2014 ते 2024 मध्ये 10 लाख 5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत.

  • Written By: Last Updated:

पुणेः पुण्यातील भाजपच्या (BJP) महाअधिवेशनात भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार (Sharad Pawar) हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख असल्याचा हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महाराष्ट्राला किती निधी दिला हे सांगताना शरद पवार यांना एक चँलेंजही दिले आहे.


निपाह व्हायरसचा धोका वाढला, केरळमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, नातेवाईकांना निगराणीत ठेवले…

अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत 2014 ते 2024 मध्ये 10 लाख 5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. शरद पवार यांना यावर भरवसा नसेल तर पुण्यातील कुठल्या चौक निवडा. आमचा मुरलीधर मोहोळ हे तुम्हाला हिशोब घेऊन उभा राहिल. ते एक-एक रुपयांचा हिशोब देईल. मी दहा लाख कोटी रुपयांचा हिशोब घेऊन आलोय. त्याला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तसाच जोरदार प्रतिसाद दिला आहे. मोहोळ यांनी हात उंचावून अंगठ्याने ‘नक्कीच’ असा संदेश देत शहांच्या आव्हानाला दाद दिली आहे.

“डोकं धरून बसू नका, विधानसभेत कसर भरून काढा”; अमित शाहांचं कार्यकर्त्यांना टॉनिक

मराठा आरक्षणावरून अमित शाहांनी पवारांना घेरले

निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) अनेक खोटे दावे केले. तसेच ते भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहेत. असा जोरदार हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलाय.अमित शाह, महाराष्ट्रातील राजकारण निवडणुकांना मी तिसऱ्या व्यक्ती म्हणून पहात असताना मी निरीक्षण नोंदवला आहे. की, जेव्हा जेव्हा राज्यात भाजपच सरकार आला आहे तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळाला आहे. तर जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येतं तेव्हा आरक्षण गायब होतं. कारण 2014 ला भाजपचा सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत टिकणार आरक्षण मराठा समाजाला दिले गेले. मात्र ते पुन्हा गायब झालं त्यानंतर आता पुन्हा शरद पवारांचे सरकार आलं तर मराठा आरक्षण गायब होईल. त्याचबरोबर पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, तसेच दूध पावडर आयात केल्याचा खोटा दावा निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी केला भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहेत.

follow us