Download App

जातीनिहाय जनगणना करा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या, अमोल कोल्हेंची संसदेत मागणी

सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे- अमोल कोल्हे

Amol Kolhe : आज संसदेत (Parliament Session) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सरकावर जोरदार टीका केली. आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी मराठा आरक्षण, कांदा उत्पादक आणि दुध उत्पादकांच्या (Milk producer) प्रश्नांवरून सरकावर घेरलं. यावेळी त्यांनी जातीनिहाय जनगणना करावी आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) द्यावे, अशी मागणीही केली.

हिंदू हिंसक! संसदेत राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी; देवेंद्र फडणवीसांनी बजावलं 

सभागृहात बोलत असताना कोल्हे म्हणाले की, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला. मात्र, दुर्दैवाने त्याच दिवशी केंद्र सरकारने दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला. आज देशात पाण्याची बाटली वीस रुपयांना मिळते. मात्र, शेतकऱ्यांना दूध विक्री करताना प्रतिलिटर 20 ते 22 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा हा निर्णय आहे का?, असा संतप्त सवाल कोल्हे यांनी केला.

पंकजा मुडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, ‘त्यांच्या उमेदवारीचा काहीही…’ 

कृषी अवजारांवरील जीएसटी कमी करा
गेल्या वर्षी कांद्याची मागणी असतांना कांद्यावर निर्यातबंदी घालून पाकिस्तानच्या कांदा उत्पादकांचा भलं करण्याचं काम या सरकारने केलं, असा हल्ल्बोल कोल्हेंनी केला. किसान सन्मान निधीचा सरकार बडेजाव करतं. मात्र, शेतकऱ्यांचा खरोखर सन्मान करायचा असेल तर सरकारने कृषी अवजारांवरील 12 जीएसटी कमी करावा, पिकांना हमी द्यावा, असंही कोल्हे म्हणाले.

राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले की, देशातील 80 कोटी गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य राशन दिलं जातं. पण आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत हे सांगत असतांना 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो ही बाब लाजीरवाणी वाटत नाही का? असंही कोल्हे म्हणाले.

जातीनिहाय जनगणना करून आरक्षण द्या…
यावेळी बोलतांना कोल्हेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात मोठा आक्रोश आहे. दुसरीकडे ओबीसींमध्येही आरक्षणावरून चिंता आहे. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की, सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी कोल्हेंनी केली.

 

follow us

वेब स्टोरीज