Download App

‘संकटातून वाचवण्यासाठी बीडच्या बप्पाचा दादांना फोन’, सोनवणेंबाबत मिटकरींचा खळबळजनक दावा

Amol Mitkari यांनी दावा केला आहे की, पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आहे.

Amol Mitkari claim for Bajrang Sonawane call Ajit Pawar : बीड लोकसभा निवडणूक (Beed Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून ते संपेपर्यंत वेगवेगळ्या मुद्यांमुळे चर्चेत होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी महायुती आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याशी संपर्क साधला असल्याचा दावा अजित पवार गटाचे अमोल मिटकर यांनी केला आहे. त्याबद्दल त्यांनी ट्विट केलं आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच जनतेची काम करत असतात. त्यामुळेच बीडच्या एका बाप्पाने आज सकाळी दादांना फोन केला. तसेच त्यांनी हा फोन आपल्याला संकटातून वाचवण्यासाठी केला आहे. त्या संदर्भातच मी ते ट्विट केलं आहे. तर विधिमंडळामध्ये विरोधकांनी अजित पवारांनी आरोप-प्रत्यारोप केले. मात्र ज्या लोकांनी काल विजयोत्सोव साजरा केला तेच आता अजित पवार यांना आपल्या भविष्य विषयी चिंता करत फोन करत आहेत. असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. मात्र यावर बंजरंग सोनवणे यांनी आपण मरेपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं म्हटलं आहे.

मोठी बातमीः मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री; जोडीला दोन उपमुख्यमंत्रीही

दरम्यान :राज्यात महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडला. मविआला 30 जागा जिंकता आल्या असून महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर बीडमध्ये बजंरग सोनवणेंनी महायुतीच्या तगड्या उमदेवार पंकजा मुंडेंचा मोठा मताधिक्याने पराभव केला. तर पंकजा मुंडेंच्या प्रचारा दरम्यान अजित पवार यांनी मी सर्व काही देऊन जो मला सोडू शकतो. तो जनतेलाही सोडू शकतो. असं म्हणत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंही दम भरला होता.

300 कोटींचा वाद अन् सासऱ्याची सुनियोजित हत्या, नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठं ट्विस्ट

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, आमच्या पंकजाताईंच्या विरोधात बजरंगा उभा आहे. तो सारखा माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. ती कॅपॅसिटी मी वाढवून देत नव्हतो. मात्र धनंजय मुंडेंनी ते वाढवून द्यायला लावली. मी सांगितलं होतं काही गोष्टींची वेसन हातात ठेवावी लागते. कारण मी राजकारणात 35 वर्ष घासली आहे.

follow us

वेब स्टोरीज