Download App

Anant kalase : विरोधी पक्षनेतेपद ‘या’ पक्षाकडे जाणार; अन्यथा विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन होणार

  • Written By: Last Updated:

Anant kalase on Leader of the Opposition : येत्या १७ जुलैपासून राज्य विधीमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीतीतील फुटीनंतर राज्याला विरोधी पक्ष नेताच उरला नसल्यानं आता हे अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय, होणार काय? अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे (Anant kalase) यांनी यावर भाष्य केलं. काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाईल. मात्र, कोणीचा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला नाहीतर विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन होईल, असं ते म्हणाले. (Anant kalase on Leader of the Opposition thay said Leader of Opposition will go to Congress)

आज एका वृत्त वाहिनीशी कळसे यांनी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले, शरद पवार गटाकडून विरोधी पक्षनेता म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड याचं पाठवलं. पण, यात अनेक कायदेशीर अडचणी आहेत. १९७८ विधानसभा कायद्यानुसार सेक्शन २ मध्ये विरोधी पक्ष नेत्याचाी व्याख्या करण्यात आली. त्यात असं स्पष्ट लिहिलं की, सत्तारूढ पक्षाच्या विरोधी असलेल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता हा विरोधी पक्ष नेता असतो. त्यालाचा विधानसभा अध्यक्ष मान्यता देतील. मात्र, विरोधी पक्षनेते पदावर दोन पक्षांनी दावा केला तर त्या पक्षाचा दर्जा काय, हे तपासून विरोधी पक्ष नेता कोण, हे अध्यक्षांनी ठरवावं.

एकनाथ शिंदे यांची झोप उडविणारा तर अजितदादांचे स्वप्न भंग करणाारा सर्व्हे 

ते म्हणाले, आतापर्यंत विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे होते. पण, अजित पवार गटाने बंड केल्यानं आता विरोधी पक्षनेतेपदासाठी आव्हाडाचं नाव समोर आलं. एकंदरीत राष्ट्रवादीत सकृतदर्शनी फुट पडल्याचं दिसतं. मात्र, ही फुट कोणीही मान्य केली नाही. अजित पवार म्हणतात आम्ही पक्षातून बाहेर पडलोच नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा आमचाच पक्ष आहे. तर शरद पवार हे तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आव्हाडांच नाव समोर केलं. मात्र, जे विरोधी बाकावर बसणारे पक्ष आहेत. त्यात कॉंग्रेसचे सर्वात जास्त आमदार आहेत. शिवाय, त्यांच्यात फुट नाही. गट नाहीत. स्टेटसप्रमाणे कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळं आता विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेसने दावा केला तर कॉंग्रेसचा आमदार विरोधी पक्षनेता होईल. मात्र, अद्याप कॉंग्रेसने दावा केला नाही. जर कोणीच विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा केला नाही तर विरोधी पक्षनेत्या शिवाय, हे अधिवेशन होई शकतं, असं कळसे यांनी सांगितलं.

Tags

follow us