Download App

राष्ट्रवादीत वादंग! फोटोच्या मुद्द्यावरुन अमोल मिटकरी थेट आव्हाडांनाच खेटले…

शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही, शरद पवार सर्वांचे आहेत. आव्हाडांनी अशी वक्तव्ये करू नयेत, या शब्दांत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांनी दिलीय. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरुन शरद पवारांनी आपला फोटो वापरु नये, असं सांगितलं होतं. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनीही खोचक शब्दांत दम भरला होता. त्यावर आता अमोल मिटकरींनी आक्रमक पवित्राच घेतल्याचं दिसून आलं आहे.

Shah Rukh Khan: अखेर किंग खान भारतामध्ये परतला! अपघातानंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतलीयं. अजित पवारांच्या या कृतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं समर्थन नसल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यावरुन आता या दोन गटांतील नेत्यांमध्ये कलगीतुराच रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Family Political Crisis : काका विरुद्ध पुतण्या! कोण ठरलं देशातील राजकीय आखाड्यात ‘वस्ताद’

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर स्वत: शरद पवारांनी सांगितलं की, मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Ameesha Patel: विक्रम भट्टसोबतच्या अफेअरबद्दल अमीषाला अजूनही होतोय पश्चाताप; म्हणाली, “माझं करिअर…”

त्यानंतरही अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरल्याचं दिसून आलं होतं. एवढंच नाहीतर आजच्या बैठकीसाठी मुंबईतील बांद्रा परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवरही शरद पवारांचा फोटो आहे. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी आपली भूमिका मांडत अजित पवार गटाच्या नेत्यांना सुनावलं होतं.

आमचे हिंदुत्व हे मुस्लीमविरोधी नाही, तर ते…देवेंद्र फडणवीस म्हणाले

जितेंद्र आव्हाड म्हणाले, जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी सुनावलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये पक्षांतील कार्यकर्त्यांची कोंडी होत असून काही आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिलंय तर काही आमदारांनी शरद पवारांना दिलंय. अशातच दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वादंग पेटण्यास सुरुवात झाल्याचंही दिसून येत आहे. दोन्ही गटातील नेत्यांच्या वादानंतर आता पुढील काळात दोन्ही गटातील वाद मिटणार की वाढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us