अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश का केला? थोरातांनी खरं कारण सांगितलं

Balasaheb Thorat On Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी दबावाखाली किंवा स्वार्थासाठीच काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवल्यानंतर चव्हाणांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अशोक […]

Balasaheb Thorat Lok Sabha Election दरम्यान युती-आघाडींचे आरोप-प्रत्यारोप; भाजपच्या जाहिरातींवरून थोरातांचा हल्लाबोल

Balasaheb Thorat

Balasaheb Thorat On Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी दबावाखाली किंवा स्वार्थासाठीच काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवल्यानंतर चव्हाणांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाणांवर हल्लाबोल चढवला आहे.

आता बाळासाहेब थोरातांवर काँग्रेसची भिस्त; ‘डॅमेज कंट्रोल’साठी मिळणार मोठी जबाबदारी

बाळासाहेब थोरात म्हणाले, एकीकडे दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज अश्रूधूर सोडला जात होता, त्याचवेळी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेससाठी खूप काही केलं. ते मुख्यमंत्री राहिले त्यांचे चिरंजीव म्हणून अशोक चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली. ते मंत्री, मुख्यमंत्र, प्रदेशाध्यक्ष राहिले. आत्तापर्यंत ते तत्वज्ञानवर भाषण करत होते पण आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडली.. त्यांच्यावर कोणता दबाव होता..काय कारण होतं..त्यांनी काँग्रेस सोडावं. याचा अर्थ ते दबावाखाली किंवा स्वार्थासाठीच काँग्रेस सोडून भाजपात गेले असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

“मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार”; भाजप प्रवेशाच्या चर्चांना नाथाभाऊंचा फुलस्टॉप!

तसेच ज्या पद्धतीने राज्य सरकार बनलं आहे, त्याला खोके सरकार म्हणतात. ज्यांच्यावर पंतप्रधान आरोप करतात, त्यानंतर ते सरकारमध्ये जातात. आता अशोक चव्हाणांवर कोणतातरी दबाव आहे किंवा स्वार्थ आहे त्याच्याशिवाय ते भाजपात जाऊच शकत नाहीत. हे जे चाललं ते चुकीचं चाललं आहे, महाराष्ट्र इतका अस्थिर कधीही नव्हता. स्वायत्त संस्थांचा गैरवापर कधीच झाला नव्हता. 15 तारखेला आमची एक बैठक होणार असून आम्ही राज्यसभा निवडणूकही जिंकणार आहोच. सोबतच लोकसभेलाही आघाडी म्हणून आम्हालाच अधिक जागा मिळणार आहेत. राज्याच्या जनतेच्या मनात आघाडीचंच सरकार असल्याची शाश्वतीच बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली आहे.

शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवर, राजधानीत महिनाभर जमावबंदी; काय सुरु, काय बंद?

फडणवीस पुन्हा विरोधी पक्षनेते म्हणून येणार…
मागील अनेक दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मी पुन्हा येणार आहे. त्यानंतर मीदेखील एकदा म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील पण विरोधी पक्षनेते म्हणून येणार आहेत. आत्ताही ते विरोधी पक्षनेते म्हणून पुन्हा येणार असल्याचा दावा बाळासाहेब थोरातांनी केला आहे.

Exit mobile version