शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवर, राजधानीत महिनाभर जमावबंदी; काय सुरु, काय बंद?

शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवर, राजधानीत महिनाभर जमावबंदी; काय सुरु, काय बंद?

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या (Farmers Protest)पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi)एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात तणाव आणि सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीमध्ये एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये सभा, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यावर आणि लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली आहे.

अशोक चव्हाणांसोबत कॉंग्रेसच्या किती आमदारांचा राजीनामा? नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं

शेतकरी संघटनांचं हे वादळ उद्या मंगळवारी (दि.13) दिल्लीमध्ये धडकणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीच्या सीमेवर हे वादळ थंडावणार का? हे पाहावं लागणार आहे. शेतकऱ्यांच्या चलो दिल्ली आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये जागोजागी सिमेटचे ब्लॉक टाकून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत.

तसेच हरियाणात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. एसएमएस सेवेवरही निर्बंध आणले आहेत. तरी आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी दिल्लीत धडकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चानेही 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे.

चव्हाणांना सोबत घेऊन भाजप लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेणार? काय आहे प्लॅन?

पंजाब (किसान मजदूर संघर्ष समिती) KMSC चे अध्यक्ष सुखविंदर सिंग सभारा (Sukhwinder Singh Sabhara)म्हणाले की, उद्या सकाळी… 200 शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करतील. अपूर्ण राहिलेलं आंदोलन पूर्ण करण्यासाठी. 9 राज्यांतील शेतकरी संघटना (Farmers Association)संपर्कात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुद्दुचेरी, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब ही सर्व राज्ये आंदोलनासाठी सज्ज आहेत.

दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा (Sanjay Arora)यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही प्रकारची रॅली किंवा मिरवणूक काढण्यावर आणि रस्ते आणि मार्ग रोखण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 12 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत लागू असणार आहे. दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार, ट्रॅक्टर रॅलीला राजधानी दिल्लीच्या सीमा ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांकडून हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यांच्या लगतच्या जिल्ह्यांच्या सीमेवरुन येणाऱ्या सर्व वाहनांची पोलीस कडक आणि कसून तपासणी केली जाणार आहे. या आदेशात म्हटलंय की, भावना भडकावणे, घोषणाबाजी करणे, भाषण देणे किंवा तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संदेश पाठवणे यावर बंदी असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज