चव्हाणांना सोबत घेऊन भाजप लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेणार? काय आहे प्लॅन?

  • Written By: Last Updated:
चव्हाणांना सोबत घेऊन भाजप लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेणार? काय आहे प्लॅन?

Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांनाच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं पक्षालाही मोठा धक्का बसला. दरम्यान, आजवर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन विरोधकांना दुबळ करणं आणि भाजपची ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचा हेतू केवळ लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक घेणं हाच आहे, असं बोलल्या जातंय.

अशोक चव्हाण राज्यसभेवर? राज्यसभेचे समीकरण बदलणार 

खरंतर लोकसभा निवडणुका संपल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजत असते. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची शक्यता बळावली आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सत्ता स्थापन करून भाजपला मतदारांवर आपली छाप पाडता आली नाही. महायुती सरकारच्या उद्योगधार्जिण्या धोरणांमुळं जनता पिळून निघाल्याचं विरोधक आरोप करतात. विधानसभा निवडणुका झाल्यास आपला पराभव अटळ आहे, याची जाणीव भाजपला झाली. त्यामुळेच भाजपकडून महाविकास आघाडीत फुट फाडण्याचा प्रयत्न केला जातोय. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुका एकत्र लढल्यास भाजपची डोकेदुखी होणार हे निश्चित आहे. त्यामुळं ईडीची भीती दाखवून विरोधकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय.

अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री ? शिंदे, अजितदादांचे पंख छाटले ! राज्याचे गणित कसे बदलणार ? 

दरम्यान, विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्यास पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याचा मतदारांवर प्रभाव पडेल. तसेच या निवडणुकीत राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांमुळेही मतदारांना प्रभावित करता येईल, असा भाजपचा होरा आहे. नुकताच राम मंदिराचा प्राणपप्रतिष्ठा सोहळा साजरा झाला. त्यामुळं राज्यातील बहुसंख्या जनता ही मोदींच्या पाठीशी आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी भाजप विरोधकांना ईडीच्या धाक दाखवून आपल्या सोबत घेत असल्याचा आरोप होतोय.

भाजपला राज्यात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी १४० जागा जिंकण्याचा निर्धार केला. आपला मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या ज्या आमदारांना सोबत घेतल्या जात आहे, त्यांना केवळ पुढच्या सहा महिन्यांसाठी सोबत घेतल्या जातं नाहीत, तर विधानसभआ निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकतो, तो पराभव टाळण्यासाठी भाजपची ताकत वाढवली जात आहे. भाजपची ताकद वाढवून लोकसभेबरोबर निवडणुका झाल्यास भाजपची सत्ता येऊ शकते, असा विश्वास भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळं चव्हाणांसारख्या नेत्यांना सोबत घेण्याचा भाजपचा डाव आहे.

दरम्यान, आता चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणूका सोबतच घेण्यात येतील या चर्चेत काही तथ्य नाही. असं असलं तरी भाजप ऐनवेळी कोणताही निर्णय घेऊ शकते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका सोबतच घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज