अशोक चव्हाण राज्यसभेवर? राज्यसभेचे समीकरण बदलणार

अशोक चव्हाण राज्यसभेवर? राज्यसभेचे समीकरण बदलणार

Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या BJP चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी राहुल नार्वेकरांसह भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करुन राज्यसभेवर जाणार आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

‘मी ‘ते’ रेकॉर्डवर आणू शकत नाही’; प्रणिती शिंदेंकडून चव्हाणांच्या राजीनाम्याची पोलखोल

राज्यसभा खासदारांचं संख्याबळ विचारात घेतलं असता भाजपचे तीन खासदार, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक असे खासदार राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची ताकद पाहता काँग्रेसचा उमेदवारही राज्यसभेवर निवडून जाऊ शकत होता, मात्र आता अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदारांनी राजीनामा दिला तर काँग्रेसला सहावा उमेदवार राज्यसभेत जाणं अवघड होणार आहे. काही दिवसांपूर्वीच रघुराम राजन हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यसभेसाठी राजन यांच्याच नावाचा काँग्रेस विचार करत असल्याचं वाटत होतं. मात्र, आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यसभेचं राजकीय समीकरण बदलणार आहे. चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधताना तोडक्या भाषेत संवाद साधला आहे.

अशोक चव्हाण यांनी अद्याप कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट केली नसली तरीही चव्हाण राज्यसभेत खासदार होतीलच असं अनेकांना वाटत आहे. तर त्यांची मुलगी भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून चव्हाणांची राजकीय वारसदार ठरु शकते. अशोक चव्हाण यांच्या मागे कोणतीही ईडी अथवा सीबीआय चौकशी नव्हती. मात्र तरीही त्यांनी काँग्रेस सोडली आहे. आता राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता येणार नसल्याचं वाटत असल्यानेच काँग्रेसच्या जहाजाला गळती लागली आहे. राहुल गांधी यांची संकल्प यात्रा पोहोचण्याआधीच भाजपकडून हे धक्के देण्यात आले आहेत. अनेक आमदारांची नावे अशोक चव्हाणांसोबत जोडली जात आहेत. चारपैकी तीन आमदार तरी जातील असं सांगितलं जातं आहे. यामध्ये विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, राजेश पाडवे, कुणाल पाटील अशा आमदारांची नावे चव्हाण गटात घेतली जातात. आता हे आमदार जातील की नाही हे विशेषत: राज्यसभा निवडणूकीतच स्पष्ट होणार आहे.

पहिल्या आठवड्यातच लाल सलामची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अ‍ॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस

मी अद्याप तरी आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याचं विश्वजीत कदमांनी बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे. मतदारांशी बोलूनच हा निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत. भविष्यात तेही भाजपात जाऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरी बाजू म्हणजे विश्वजीत कदम यांचे सासरे आणि उद्योजक अविनाश भोसले हे ईडीच्या, सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचंही नाव भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये घेतलं जात आहे.

दरम्यान, आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने आगामी काळात भाजपकडून लोकसभा आणि राज्यसभा निवडणूका सोबतच घेण्यात येतील का? अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चर्चेत काही तथ्य नाही, मात्र भाजप ऐनवेळी कोणताही निर्णय घेऊ शकते. कारण अयोध्येतील राम मंदिरामुळे देशात भाजपने वेगळं वातावरण करण्याचा भाजपचा प्लॅन यशस्वी झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज