Ashok Chavan News : प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरे को पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हु, वो करके दिखाता हु. मग ते विकासाचं काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो.” अशी डायलॉगबाजी भाजप नेते अशोक चव्हाण यांनी एका सभेत केली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या याडायलॉगबाजीनंतर सभेत उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडात करण्यात आला.
संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तर आता भाजपकडून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. त्यांनी आपलं होम ग्राउंड म्हजेच नांदेड जिल्ह्यातून प्रचाराची सुरुवात केली आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात त्यांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात येत आहे. बिलोली शहरात आयोजित एका सभेमध्ये अशोक चव्हाण यांनी तुफान डायलॉगबाजी करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपचे स्टार प्रचारक अशोक चव्हाण सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. यामुळे ते नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत अशोक चव्हाण भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करत आहे.
काल रात्री ते बिलोली शहरात आयोजित सभेत बोलत होते. या सभेत त्यांनी तुफान डायलॉगबाजी केली. याडायलॉगबाजीनंतर सभेत उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडात करण्यात आला.
इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप
या सभेत अशोक चव्हाण म्हणाले, भाजपचे जुने लोक आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या लोकांमुळे आता आपली ताकद वाढली आहे. आपली ताकद डबल झाली आहे. डबल ताकद झाल्यामुळे और किसीको देखने की जरुरत नही है.
मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू