Download App

अशोक चव्हाण भाजपमध्ये येणारच ? बावनकुळेंचा हवाला देत प्रताप चिखलीकरांचा दावा

  • Written By: Last Updated:

Prataprao Chikhalikar On Ashok Chavan: भाजपमध्ये काँग्रेसचे अनेक नेते आलेले आहेत. त्यात आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपवासी होतीत, असा दावाही अनेकदा वेळीवेळी भाजपकडून (Bjp) करण्यात येतो. त्यात काँग्रेसमधील (Congress) अशोक चव्हाण (Ashok Chavan) व त्यांना मानणारा एकही गटही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होतात. या चर्चा अनेकदा अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावल्या आहेत. आता पुन्हा भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर (Prataprao Chikhalikar)यांनी असाच दावा केला आहे. अशोक चव्हाण हे नक्की भाजपमधील येतील, असा दावा चिखलीकरांचा आहे. त्याबाबत त्यांनी काही कारणेही माध्यमांसमोर सांगितली आहेत. (Congress leader ashok chavan will join bjp mp prataprao-chikhalikar statement)

‘खरगे-फरगेंना ओळखत नाही नितीश कुमारच..,’; इंडिया आघाडीत जेडीयूच्या आमदाराचा मिठाचा खडा!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडला होते. त्यांनी मुखेड येथे तीन विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड येथे तीन विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली आहे. आगामी काळात भाजपमध्ये येण्यासाठी अनेक मंडळी तयार आहेत. त्यात अशोक चव्हाण यांच्या नाव असल्याचे बावनकुळे सांगत असल्याचे चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. अशोक चव्हाण हे कितीही काँग्रेसनिष्ठ असले तरी आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माझी धारणा आहे.

मुख्यमंत्री सचिवालयात बाहेरील सहा उमेदवारांची ओएसडीपदी नेमणूक; आरटीआयमध्ये मोठा खुलासा


भाजपकडून चव्हाण सहकारी कारखान्याला दीडशे कोटींची मदत

माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसच्या काळापेक्षा जास्त मदत त्यांना भाजप सरकारकडून झाली असल्याचा दावाही चिखलीकरांनी केला आहे. नांदेडला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला भाजप सरकारकडून तब्बल दीडशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली असल्याच मी वर्तमानपत्रात वाचले आहे. त्याचा अर्थ आहे ते भारतीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर हात पसरतात. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये यायचे आहे, असे चिखलीकरांनी म्हटले आहे.

Tags

follow us