‘खरगे-फरगेंना ओळखत नाही नितीश कुमारच..,’; इंडिया आघाडीत जेडीयूच्या आमदाराचा मिठाचा खडा!

‘खरगे-फरगेंना ओळखत नाही नितीश कुमारच..,’; इंडिया आघाडीत जेडीयूच्या आमदाराचा मिठाचा खडा!

India Alliance : इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक पार पडल्यानंतर आता आघाडीत मोठा मिठाचा खडा पडणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. कारण बुधवारी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान, इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेचा (Mallikarjun Kharge) पंतप्रधानपदासाठी प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं समोर आलं. खरगेचं पंतप्रधानपदासाठी नाव पुढे येताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) नाराज झाल्याच्या चर्चा पुढे आल्या. अशातच आता जेडीयूचे आमदार गोपाल मंडळ यांनी कोण खरगे-फरगे नाही ओळखत नितीश कुमारच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं विधान केलं आहे.

पंतप्रधानपदासाठी बैठकीत खरगेचं नाव पुढं आलं. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जून खरगेंकडून या चर्चेबद्दल खंडन केलं नसल्याचं दिसून आलं. आधी आपण एकत्र येत जिंकू मग पंतप्रधानपदाचं ठरवू, अशी भूमिका खर्गेंकडून मांडण्यात आली आहे. दरम्यान, या नावाला विरोध होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

जलसंधारण विभागात नोकरीची संधी, जलसंधारण अधिकारी पदांच्या 670 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

बैठकीत विविध पक्षांच्या नेत्यांकडून आपापल्या नेत्यांचं नाव पुढे करण्यात असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे आता एकाच व्यासपीठावर हे सर्व विरोधी पक्ष भाजपला पराभूत करण्यासाठी एकवटले आहेत. एका बाजूला भाजपला पराभूत करण्याचं उद्दिष्ट तर दुसरीकडे पंतप्रधानपदावरुन अनेक नेत्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे आता एक प्रकारे इंडिया आघाडीत मिठाचा खडाच पडणार असल्याचं बोललं जातं आहे.

शिवसेनेच्या शिलेदाराविरोधात तटकरे, भाजपची मोर्चेबांधणी : कोंडी फोडण्याचे CM शिंदेंपुढे आव्हान

पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव पुढे येताच जनता दल युनायटेड पक्षाचे आमदार गोपाल मंडल यांनी मल्लिकार्जून खर्गेंबद्दल वादग्रस्त विधानच केलं असल्याचं पाहायला मिळतंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संपूर्ण देश ओळखतो. तेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असून जनता मल्लिकार्जुन खरगेना ओळखतही नाही.

LPG Price : गुडन्यूज! नववर्षाआधीच LPG गॅसच्या दरात मोठ्ठी कपात; व्यावसायिकांना दिलासा

काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांचं नाव पुढे ऐकायला मिळत आहे. पण नितीश कुमारांना संपूर्ण देश ओळखतो, त्यामुळे नितीश कुमारच पंतप्रधान होणार असल्याचं विधान मंडल यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube