Download App

अहमदनगर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.24 टक्के मतदान

  • Written By: Last Updated:

Ahmednagar assembly constituency average of 18.24 percent : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) आज सकाळी सात वाजता सुरुवात झालीय. त्यानंतर राज्यात वेगाने मतदान होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यामध्ये सरासरी 18.14 टक्के मतदान झालंय. अहमदनगर विधानसभा मतदारसंघात (Ahmednagar assembly constituency) सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी 18.24 टक्के मतदान झालंय. संध्याकाळी सहावाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. पुढील काही तासांमध्ये मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

सकाळी अकरा वाजेपर्यंत खालीलप्रमाणे मतदान झालंय.

अकोले विधानसभा मतदारसंघ – 19.08 टक्के
संगमनेर विधानसभा मतदारसंघ – 20.65 टक्के
शिर्डी विधानसभा मतदारसंघ – 19.54 टक्के
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ – 21.01 टक्के
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ – 12.8 टक्के
नेवासा विधानसभा मतदारसंघ – 22.27 टक्के
शेवगाव विधानसभा मतदारसंघ – 17.78 टक्के
राहुरी विधानसभा मतदारसंघ – 15.9 टक्के
पारनेर विधानसभा मतदारसंघ – 17.42 टक्के
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ – 16.92 टक्के
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ – 15.26 टक्के
कर्जत विधानसभा मतदारसंघ – 20.78 टक्के

सापळ्यामध्ये कधी चुकून माणूस अडकतो ; तावडेंवरील आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

आज 20 नोव्हेंबर, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी मतदानाचा दिवस आहे. सकाळी 7  ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान करता येईल. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्‍कलिंगम यांनी केलंय.

‘आज तुझा मर्डर फिक्स…’ भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, नांदगावमध्ये मोठा राडा

राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्यभरामध्ये तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर संपूर्ण राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्र देखील सज्ज करण्यात (Assembly Election 2024) आलेली आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 4 हजार 136 उमेदवार आहेत. राज्यातील एकूण 9.7 कोटी मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

follow us