Download App

१६ ऑक्टोबरपर्यंत कोणतंही राजकीय विधान करणार नाही; बच्चू कडूंनी राजकीय मौन का घेतलं?

  • Written By: Last Updated:

नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे कायम चर्चेत असतात. कधी ते सरकारविरोधात आंदोलन करतात, तर कधी रोखठोक वक्तव्य करून चर्चचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शऱद पवारांवर टीका केली होती. मात्र, आता त्यांनी 16 ऑक्टोबरपर्यंत आपण कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करणार नसल्याचे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात आणखी उलथापालथ होणार का, अशी आता चर्चा सुरू झाली आहे.

बच्चू कडू हे आज पनवेलमधील कार्यक्रमासाठी नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात कोल्डवॉर सुरू आहे. सरकारमध्ये नाराजी आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारला होता. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, सध्या मी कोणत्याही राजकीय प्रश्नाला उत्तर देणार नाही. आजपासून १६ ऑक्टोबरपर्यंत मी कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. केवळ सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्नीच बोलेन. इतर कोणत्याही राजकीय प्रश्नाला उत्तर मी देणार नाही. आमचे १६ ऑक्टोबरपर्यंत राजकीय मौन असल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितलं होतं. बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरणं ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. याबाबत बोलतांना आज ते म्हणाले, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न मिळाला आहे. गेमिंगबाबत त्यांनी केलेली जाहिरात अत्यंत वाईट आहे. एखादं मोठं नेतृत्व जुगाराची जाहिरात करते, त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत आहे. युवकांची घरं बर्बाद असतील तर त्याला आमचा विरोध आहे. सचिन तेंडुलकरबाबत आदर पण, त्यांना जाहिरात करायची असेल तर भारतरत्न परत करावे, आणि जाहिरात करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

डेव्हिड वॉर्नरने गुप्तांगात लपविले होते ‘हॉटस्पॉट’ : विमानतळावर सर्वांसमोरच शरमेने मान खाली 

ते म्हणाले, सचिन तेंडुलकर यांनी जाहिरात मागे घेतली नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करू. आम्ही आंदोलनाची तारीख उद्या जाहीर करू. सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण दिलं किंवा नाही दिलं तरी आम्ही आंदोलन करू, असा इशाराही कडू यांनी दिला.

दरम्यान, वारंवार सरकारमधील नाराजी, अजित पवारांच्या निर्णयावरून धुसफुस याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तरीही मी १६ ऑक्टोबरपर्यंत कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही, असा निर्णय घेतला आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यावर असं काय कारण आहे, ज्यामुळं तुम्ही 16 ऑक्टोबरपर्यंत बोलणार नाही, असा प्रतिसवाल पत्रकारांनी केला. त्यावर हे चांगलं काम आहे. चांगल्या कामात अडथळा नको, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे, असं कडू यांनी सांगितलं. त्यामुळं 16 ऑक्टोबरपर्यंत नेमकं काय होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Tags

follow us