Bachhu Kadu : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. ओबीसी-मराठा (Maratha-OBC) समाजातील वाद आता चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे राज्यात शांतता ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना मुख्यंमत्री करा, असं मोठं विधान प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केलं आहे. कडू यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला आहे.
‘हे चुकीचंच, मनोरंजनाला फाशी द्या…’, संसदेत सुरक्षा भंग करणाऱ्या मनोरंजनच्या वडिलांची प्रतिक्रिया
बच्चू कडू म्हणाले, सर्व समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांना का बरं मुख्यमंत्री करु नये, आत्तापर्यंत 8 मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा बांधव आज आरक्षण मागत आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. राज्यात माळी, तेली, आदिवासी, दलितांना नेतृत्व दिलं पाहिजे, मी अधिवेशनात काय बोलावं हे आमच्या मनावर आहे. सर्व समाजबांधवांना यामध्ये घेतलं तरच सर्वांचं समाधान होईल, राज्यातील परिस्थिती शांततामय होणार असल्याचंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
Jackie Shroff: जॅकी श्रॉफने स्मृती इराणींना दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘वजन कमी करा… ‘
जरांगे पाटलांनी एकेरी बोलू नये…
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी कोणावरही व्यक्तिगत टीका करु नये. जरांगे शांत स्वभावाचे आहेत त्यांनी आक्रमक आणि एकेरी बोलू नये, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांबद्दल असं बोलू नये, तरच राज्यात शांतता राहणार असल्याचा सल्ला बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंना दिला आहे.
मराठा म्हणजे अठरा-पगड जाती…
कुठलाही महापुरुष एका जातीपुरता मर्यादित नसतो सर्वांसाठी असतो. महापुरुषांवर कोणी आग पेटवत असेल तर चुकीचं आहे. मराठा एका जातीचं नाव नाही. मराठा म्हणजे अठरा पगड जाती आहेत. महाराष्ट्रासाठी अठरा पगड जाती लढल्या आहेत. मराठा हा सामुवाचिक शब्द असून बाबासाहेबांनीही त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हटलेले आहे. त्यानंतर सरकारनेही ते मान्य केलं आहे. मराठा हा शब्द एका जातीपुरताच मर्यादित नाही तो सर्वांना लागू आहे. त्यामध्ये तेली, माळी, कुणबी, धनगर सर्वच समाजबांधव येत असल्याचं कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जातीं-जाती जे भेद करण्याचं काम सुरु आहे ते लाजिरवाणं आहे. तणाव निर्माण झाला तर लोकांच्या हाती पुस्तकांऐवजी तलवारी आल्या तर अजून शेकडो वर्ष मरावं लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.