Download App

रात्री साडेबारा वाजता शिवतारेंना फोन,अजित पवार म्हणाले, हृदयात कुठेतरी दुखतं …

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Baramati Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात (Baramati constituency) निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी काल (दि. 9 एप्रिल) बारामती दौऱ्यादरम्यान एका मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) बारामती मरदारसंघातून उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी रात्री साडेबारा वाजता एका जेष्ठ नेत्याचा फोन आला होता. पवार यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या मेळाव्यात अजित पवार म्हणाले, विजय शिवतारे मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी मला कोणाकोणाचे फोन आले होते हे दाखविले. यावेळी माझ्यासबोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील होते. विजय शिवतारे यांना रात्री साडेबारा वाजता कुणी फोन केला होता हे जाणून मला अतिशय वाईट वाटले. राजकारण कोणत्या पातळीवर होत आहे याची मला जाणीव झाली. ज्यांच्यासाठी मी जीवाचं रान केलं त्यांनीच अशा पद्धतीने माझ्या विरोधात अशा गोष्टी करणे दुःखदायक होतं. माझ्या हृदयात कुठेतरी दुखत आहे म्हणून हे सगळं इथे बोलावं लागतं असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणात आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत त्या जेष्ठ नेत्याचे नाव जाहीर करावे असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या देशात लोकशाही आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र विजय शिवतारे यांना रात्री साडेबारा वाजता कोणत्या जेष्ठ नेत्याने फोन करून उमेदवारी मागे न घेण्याचा सल्ला दिला हे मलाही समजायला आवडेल असा टोला त्यांनी यावेळी लावला. अजित पवार यांनी केलेल्या प्रत्येक वक्तव्यावर माझ्याकडे उत्तरे नाही. ज्यांनी हे वक्तव्य केले आहे त्यांनाच प्रश्न विचारा असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

follow us

वेब स्टोरीज