दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीपासूनच त्यांची लाईन क्लिअर; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीपासूनच त्यांची लाईन क्लिअर; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

Supriya Sule Criticize Raj Thackeray : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या की, ते दिल्लीला भाजपच्या मोठ्या नेत्यांना भेटले त्यावेळेस त्यांची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती.

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ चा टीझर पाहून आलिया झाली इम्प्रेस; ट्वीट शेअर करुन केलं कौतुक

आज ( 10 एप्रिल ) माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांना राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा केली त्यावर प्रश्नं विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या की, दहा ते पंधरा दिवस यापूर्वी ते दिल्लीला भाजपच्या मोठ्या नेत्यांना भेटले त्यावेळेस त्यांची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती. मात्र त्यांची मते कोणाच्या पारड्यात पडतील हे काळच ठरवेल. तसेच मी त्यांचं भाषण काल ऐकलं नाही प्रचारात होते. असं म्हणत सुळे यांनी राज यांना टोला लगावला आहे.

Raj Thackeray : भाजपाला पाठिंबा देताच मनसेला गळती, राज यांना पत्र लिहीत सरचिटणीसाचा राजीनामा

तसेच यावेळी बारामतीमध्ये अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर देणे टाळले. अजितदादांच्या टीकेवर त्या म्हणाल्या की, लोकशाही आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तर अजित पवार यांनी उल्लेख केलेले. ज्येष्ठ नेते आहेत. मला याची माहिती नाही. मला समजायला हे आवडेल ते कोण ज्येष्ठ नेते आहेत. जे शिवतारे यांना निवडणूक लढवण्यासाठी म्हणत होते. माघार घेऊ देत नव्हते. दरम्यान कालच्या भाषणात अजित पवार यांनी आरोप केला होता की, माझ्या जवळच्या ज्येष्ठ नेत्यांकडून शिवतारे यांना निवडणूक लढवण्यासाठी सांगितले जात होते.

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; साताऱ्यातून शशिकांत शिंदे, रावेरसाठी श्रीराम पाटील

तसेच या भाषणात अजित पवार यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले की, संसदेत भाषणं करून मतदारसंघाची कामं होत नाहीत. भाषणंच करायची असतील तर मी देखील एक नंबर आहे. माझी पट्टी लागली तर मी ही चांगली भाषणं करतो. पण मी भाषणंही करतो आणि कामही करतो. मी विकासाला निधी आणतो. एखादं काम वाजवून करून घेतो. असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देत त्यांना टोला लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube