Download App

मोठी बातमी! गोगावलेंचा अवैध व्हीप नार्वेकरांनी कसा ठरवला वैध?; स्वतःच केला खुलासा

  • Written By: Last Updated:

Rahul Narvekar : काल (दि. १० जानेवारी) शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिला. हा निकाल देतांना त्यांनी मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) असल्याचं म्हटलं. शिवाय, विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवला. तर ठाकरे गटाचे सुनील प्रभूंचा व्हीप अवैध ठरला. या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दरम्यान, सुप्रीम कोर्टाने गोगावलेंचा व्हीप अवैध ठरवला असतांना नार्वेकरांनी तो व्हीप वैध ठरवला, अशी टीका नार्वेकरांवर होऊ लागली. त्यावर आता खुद्द नार्वेकरांनी भाष्य केलं.

Hindu Tan-Man Song: ‘मैं अटल हूं’मधील ‘हिंदू तन-मन’ नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 

आज एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत बोलतांना नार्वेकरांनी कोर्टाने गोगावलेंचा व्हीप अवैध ठरवला असतांना आपण तो वैध कसा ठरला? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलतांना नार्वेकर म्हणाले, सुनील प्रभू यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी न्याय्य ठरवली आणि गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरवली, असा गैरसमज पसरवला जात आहे. न्यायालयाने असं सांगितले होतं की, ज्यावेळी नरहळी झिरवळ यांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची निवड केली तेव्हा त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचे 21 जून 2022 रोजी लिहिलेले पत्र होते. त्यावेळी त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचे पत्र नव्हते. त्यामुळे त्यांना एकच राजकीय पक्ष वाटला म्हणून त्यांनी दोघांची निवड केली.

पेपरफुटीच्या प्रकारानंतर विद्यापीठाला जाग; बार्टी, महाज्योती, सारथी परीक्षा स्थगित… 

ते म्हणाले, झिरवळ यांनी दोघांची निवड केली. मात्र 3 जुलै 2022 रोजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत निर्णय घेतला. कारण, त्यावेळी अध्यक्षांकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांची पत्रे होती. पक्षात फूट पडल्याचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना माहीत होते. त्यामुळं त्यांनी विधानसभेतील संख्याबळ पाहूनच एकनाथ शिंदे आणि भरत गोगवले यांची निवड केली होती. ती निवड चुकीची आहे. कारण, नार्वेकरांनी राजकीय पक्ष कोणता हे आधी ठरवायला हवं होतं. मग प्रतोद निवडायला पाहिजे, असं कोर्ट म्हणालं. आता विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानं कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स नुसारच निकाल दिला. आधी राजकीय पक्ष ठरवला. राजकीय पक्ष ठरवल्यानंतर प्रतोद ठरवला. कोर्टाच्या गाईडलाईन्स न डावलात निर्णय घेतला, असं नार्वेकर म्हणाले.

निकाल देतांना नार्वेकर काय म्हणाले?
‘भरत गोगवाले यांची नियुक्ती योग्य आहे. शिंदे गटाची 21 आणि 23 जून 2022 रोजीची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहेत. या दिवशी शिंदे गट हा खरा शिवसेना पक्ष बनला. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्तीही वैध आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. त्याचवेळी सुनील प्रभू यांना आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता, असं नार्वेकर म्हणाले.

 

follow us