Download App

तुमचे अश्रू पुसण्यासाठी का आले नाहीत; पहिल्याच दिवशी राहुल गांधी मोदींवर बरसले!

  • Written By: Last Updated:

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक महिने हिंसेने धगधगलेल्या मणिपूर राज्यातील थौबल येथून ही यात्रा सुरू झाली. पहिल्याच दिवशी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

काँग्रेसशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपवलं, आता शिंदेंच्या नेतृत्वात मोदींचे हात बळकट करणार; देवरांचा निर्धार

राहुल गांधी म्हणाले, मी 2004 पासून राजकारणात आहे. पण आता मणिपूरची शासन व्यवस्था संपलेली आहे. जुने मणिपूर आता राहिलेले नाही. इतकी वाईट अवस्था झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले नाहीत. तुमचे अश्रू त्यांनी पुसले नाहीत. मी तुम्हाला मन की बात नाही सांगणार. आम्ही दु:ख जाणून घेणार आहोत. त्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. भारत जोडो यात्रेत मी केवळ 25 ते 30 मिनिटे बोलत होतो. लोकांचे सात ते आठ तास एेकत होतो. मी मणिपूरच्या नागरिकांचे दुःख समजतो. आम्ही सद्भावना, शांती आणि स्नेह पुन्हा आणणार आहोत. त्यासाठी हे राज्य ओळखले जात होते.

आयरा-नुपूरच्या रिसेप्शनमध्ये CM शिंदेपासून ते सलमानपर्यंत ‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी, आमिरनं केलं स्वागत

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिल्यांदा मणिपूरला आले होते. तेव्हा त्यांनी मणिपूर राज्य देशाचा दागिना असल्याचे म्हटले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधीही मणिपूरबाबत तेच सांगत होते. मणिपूरची भूमीही स्वातंत्र्यासाठी लढली होती.

मुंह में राम और बगल में छुरी

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ मतासाठी मणिपूरला येतात. मणिपूरची जनता अडचणीत असतात, तेव्हा ते येत नाही. वे राम-राम करते हैं। मुंह में राम और बगल में छुरी, असे त्यांचे शब्द असतात. परंतु त्यांनी जनतेबरोबर असे करू नये. केवळ मतासाठी ढोंगबाजीपणा त्यांनी करू नये.

follow us