आधी नकार नंतर होकार पण, ऐनवेळी ‘रुट’ चेंज; काँग्रेसच्या न्याय यात्रेचं ‘पॉलिटिक्स’ही खास
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू होणाऱ्या (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रेबाबत महत्वाची माहिती समोर (Bharat Jodo Nyay Yatra) आली आहे. यात्रेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळ येथून यात्रा सुरू होणार होती. आता मात्र ही यात्रा थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून यात्रेसाठी देण्यात आलेल्या नियम आणि अटींमुळे काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. इंफाळ येथील हट्टा कांगजेइबुंग मैदान येथून यात्रा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. राज्य सरकारने काही अटींसह परवानगी दिली होती. त्यामुळे ऐनवेळी ठिकाणात बदल करण्यात आल्याची माहिती मणिपूर काँग्रेस (Manipur Congress) अध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी दिली.
पोलीस प्रशासनाने काही अटी टाकल्या होत्या ज्या काँग्रेसला मान्य नव्हत्या. पोलिसांनी यात्रेसाठी फक्त एक हजार लोकांना परवानगी दिली होती. परंतु, यात्रेला हजारो लोक येतील असे काँग्रेसचे म्हणणे होते. त्यामुळे अखेर काँग्रेसने ठिकाणच बदलण्याचा निर्णय घेतला. आता ही यात्रा इंफाळपासून 34 किलोमीटर दूर असलेल्या थौबल येथून सुरू होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यात्रेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करतील.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण
इंफाळ येथील हट्टा कांगजेइबुंग मैदानातून यात्रा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. तसा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. इंफाळ येथून सुरू होऊन यात्रा मुंबईत संपेल अशी घोषणाही करण्यात आली होती. 10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना आम्ही भेटलोही होतो. परंतु, परवानगी मिळणार नाही असे सांगण्यात आले. नंतर त्या रात्री एक आदेश प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये परवानगी देण्यात आली होती मात्र यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या अत्यंत कमी करण्यात आली.
त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य सचिव विनीत जोशी यांच्यासह पोलीस महानिदेशक राजीव सिंह आणि इंफाळचे माजी उपायुक्त, पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आम्हाला सांगण्यात आले की कार्यक्रमाच्या ठिकाणी एक हजारपेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे आमच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर मात्र थौबल जिल्हा उपायुक्तांनी बुधवारी रात्री उशीरा खोंगजोम येथील एका खासगी मैदानातून यात्रेसाठी परवानगी दिल्याचे मेघचंद्र यांनी सांगितले.
संसदेत घुसखोरीवेळी भाजप खासदार पळून गेले; गौप्यस्फोट करत Rahul Gandhi मीडियावर भडकले
यात्रेच्या ठिकाणात बदल झाला असला तरी पुढील मार्गावर काही परिणाम होणार नाही. रुट आहे तसाच राहिल. 14 जानेवारीला मणिपूर येथून यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेचा समारोप होईल. देशातील 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांचा प्रवास करत यात्रा मुंबई गाठणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.