Download App

शंकर जगताप मुलासारखेच…1 लाखांच्या लीडने विजयी होणार ; अश्विनी जगताप प्रचारासाठी मैदानात उतरल्या

Ashwini Jagtap Campaign For Shankar Jagtap : चिंचवड मतदारसंघात ( Chinchwad Constituency) महायुतीकडून भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. पहिल्याच यादीत शंकर जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याजागी भाजपने (bjp) शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना तिकीट देण्यात आलंय. आता चिंचवडमध्ये शंकर जगताप विरूद्ध राहुल कलाटे अशी चुरशीची लढत (Assembly Election 2024) होणार आहे.

लीडमध्ये नक्कीच ते एक लाखांची वाढ होईल, असा विश्वास अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी व्यक्त केलाय. अजून पुढचा उमेदवार दिलेला नाहीये. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. साहेबांच्या वेळीही तेच उमेदवार होते, माझ्यावेळी पण तेच होते. आतादेखील तेच उमेदवार आहेत, असं अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत. त्याच्यामुळे खूप असा फरक पडत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

Diwali 2024 : वसुबारस म्हणजे काय?, हा सण का साजरा करतात?, यावर्षी कुठला आहे शुभ मुहूर्त?

चिंचवडमधील विद्यमान आमदार अश्विनी जगताप या दीर शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. घरोघरी जातो, कोपरा मिटींग घेतो. सध्या असा आमचा प्रचार सुरू आहे. भरपूर जबाबदाऱ्या आहेत. मतदान जिथे जिथे कमी झालंय, तिथे टक्का कसा वाढेल, याचं गणित करत असल्याचं अश्विनी जगताप म्हणाल्या आहे. शंकर जगताप हे मुलासारखे आहेत. माझं लग्न झालं तेव्हा ते बारावीला होते. एकत्र कुटुंब आहे. 33 वर्षांपासून आमचा प्रवास सुरू आहे. शंकर जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करणे, हाच अजेंडा असल्याचं अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत.

माहीम मतदारसंघाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; सदा सरवणकरांची अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर

शंकर जगताप सक्षम उमेदवार आहेत. शहराध्यक्ष असल्यामुळे त्यांना अनुभव आहे. त्यामुळे ते नक्कीच शिवधनुष्य पेलवतील, असा विश्वास अश्विनी जगताप यांनी व्यक्त केलाय. कुटुंबात काहीच वाद नाहीये, हे सर्व विरोधकांनीच पेरलेलं होतं. तेच सगळ्यांच्या पुढं आलं. मताधिक्यात एक लाखात वाढ होईल, असा विश्वास अश्विनीताईंना आहे. शंकर जगताप यांनी गोरगरिबांची पहिली प्राधान्यानं कामं करावी, अशी ईच्छा अश्विनी जगताप यांनी वहिनी या नात्याने व्यक्त केलाय. विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

 

follow us