Download App

‘पाय ओढण्याचं काम काँग्रेसमध्येच’; ‘स्फोट होणार’ म्हणणाऱ्यांवर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule : भाजप व्यक्तीसाठी काम करीत नाही, पाय ओढण्याचं काम काँग्रेसमध्येच चालत असल्याचा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrshekhar Bawankule) यांनी केला आहे. दरम्यान, भाजपमध्ये मोठी खदखद सुरु असून पुढील काळात स्फोट होणार असल्याचा दावा नाना पटोले(Nana Patole) यांनी केला होता. त्यावरुन चंद्रशेखर बावनकुळेंनी(Chandrashekhar Bawankule) पलटवार केला आहे. नागपुरातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Anil Parab : अध्यक्षांच्या वेळापत्रकात कुछ तो गडबड है ! परबांचा नेमका आरोप काय ?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नाना पटोले यांना भाजप समजली नाही, म्हणूनच ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले आहेत. कोणत्याही व्यक्तीसाठी भाजप पक्ष काम करत नाही, अमृतकाळाचा भारत कसा असेल? यासाठी भाजप काम करत असल्याचं बावनकुळेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

भारत माता की जय…बावनकुळेंनी थांबवलं, मोदी मोदी म्हणा…बावनकुळेंच्या भोवती नवा वाद !

तसेच अमृतकाळ भारताच्या संकल्पासाठी भाजप काम करत आहे, त्यामुळे कधीच भाजपमध्ये स्फोट होऊ शकत नाही, पाय ओढण्याचं काम काँग्रेसमध्येच चालते, महायुतीतील तिन्ही पक्षातील प्रमुख नेते आपला पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

काय म्हणाले होते नाना पटोले?
काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठी खदखद सुरु आहे, भाजपमध्ये होत असलेला उद्रेक थांबवण्यासाठी अंतर्गत दबावतंत्राचा वापर हायकमांडकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच आगामी काळात भाजपमध्ये मोठा स्फोट होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा नाना पटोले यांनी केला.

स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू, बापानं थेट आनंद महिंद्रांवर केला गुन्हा दाखल

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता नाना पटोलेंच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केल्याने नाना पटोले काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू आहे, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही विरोधकांवर हल्लाबोल चढविला आहे.

Tags

follow us