Subhash Deshmukh and Praniti Shinde : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मोठे स्थान आहे. पण काँग्रेसकडून ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले असून देशाचे गृहमंत्रीदेखील राहिलेले आहेत. सध्या त्यांची मुलगी प्रणिती शिंदे ही सोलपूरची आमदार आहे. शिंदेंच्या कन्येला भाजपच्या नेत्याने सुशीलकुमार शिंदेंच्यासमोरच भाजपची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
पुण्यनगरी वृत्तपत्राचा सोलापूर येथील आवृत्तीचा 20 वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम आयोजत करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री सुभाष देशमूख, आमदार प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सुभाष देशमुख यांनी असे विधान केले की त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
Chandrasekhar Bawankule : ‘मी पंकजाताईंच भाषण ऐकलं, BJP माझ्या मागे असल्याचे त्यांनी म्हटलं’
प्रणितीताई आणि मी गेल्या 9 वर्षांपासून एकाच सभागृहामध्ये काम करत आहोत. सोलापूरची कोणतीही बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी त्या खंबीर आहेत. आजच्या येथील कार्यक्रमाचे नाव पॉवर ऑफ सोलापूर आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, काही पण करा भविष्यामध्ये पॉवरमध्ये रहा, तरच आमच्या सोलापूरची पॉवर वाढणार आहे, असे देशमुख म्हणाले.
तसेच त्यासाठी तुम्हाला कोणती शक्ती वापरायची आहे, कोणती युक्ती वापरायची आहे ती तुम्ही वापरा, आम्हाला त्यातील ज्ञान नाही. त्यासाठी तुम्हाला साहेबांची मार्दर्शन नक्की लाभेल, असे म्हणत देशमुखांनी प्रणिती शिंदेना पॉवरमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
विखे कुटुंबीय आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ‘हॉटलाईन’ निळवंडेच्या पाण्यामुळे पुन्हा चार्ज
दरम्यान, यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती ही माझीच मुलगी असून ती भविष्यात पुढे जाईल यात शंका नाही, असे म्हटले. पण देशमुख यांच्या वक्तव्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये खडाजंगी झाली होती. रोहित पवारांनी सोलापूरची जागा राष्ट्रवादीला द्यावी असे म्हटले होते. त्यावर प्रणितीताईंनी कोण रोहित पवार असे म्हणत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यातच आता सुभाष देशमुखांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.