Sudhir Mungantiwar On Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला समोर आला असून लोकसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचा अंदाज असल्याचा दावा केलायं. पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळाच एकच चर्चा सुरु झालीयं. आता या दाव्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दंतकथा आणि अफवा पसरवत असल्याची चपराक दिलीयं.
विधानसभेची रणधुमाळी सुरु; रामदास आठवलेंनीही 20 जागांवर दावा ठोकला…
मुनगंटीवार म्हणाले, विरोधकांची चाल षडयंत्र करणे आहे, दंतकथा आणि अफवा पसरवत आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व्हेमध्ये फक्त ‘हम दो…हमारे दो चारच’ येणार असं काहीतरी ते बोलायचे ते पण मध्यप्रदेशमध्ये आमचे 165 आले आहेत, ते गुजरातबद्दल बोलायचे पण आमचे 156 आले आहेत, जनतेला माहितीये 2 वर्ष 8 महिने त्यांनी काय दिवे लावलेत, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती? भाजपाच्या सर्व्हेवर रोहित पवारांचं खळबळजनक ट्विट..
आमदार रोहित पवार यांच्या दाव्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील पवारांचा चांगलाच समाचार घेतलायं. ते म्हणाले, ज्याना आपले चाळीस आमदार अजितदादांसोबत निघून जातात हे सोर्स माहित नसतं, ज्यांना अमित शाहा यांच्या आधी शरद पवार लालबागला येऊन जातात हे माहित नसतं. ती व्यक्ती आता महायुतीचं भविष्य सांगायला लागलीयं, हे अत्यंत हास्यस्पद असून याच्यासारखा जोक दुसरा नाही, या शब्दांत मिटकरींनी समाचार घेतलायं. तसेच स्वत:चा कर्जत जामखेड मतदारसंघ कसा वाचवता येईल याकडे त्यांनी लक्ष द्यावं, बाकी गरम तापेवर स्वतचे ओठ पोळून घेऊ नका, असा खोचक सल्लाही त्यांनी दिलायं.
रोहित पवारांचे ट्विट नेमकं काय होतं?
रोहित पवारांनी एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. ज्यात अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.
एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 10, 2024