Download App

Gopichand Padalkar : ‘मी संयमाची भूमिका घेतली नसती तर’.. चप्पलफेकीवरून पडळकरांचा संताप

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल इंदापुरात घडली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता आमदार पडळकर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. मी काल समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असे पडळकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत संयमानं आणि शांततेनं ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत आहे. सभेनंतर शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला भेट देण्यासाठी जात असताना ही नौटंकी घडली. त्यानंतर भेकडांनी नौटंकीबाजी करत मीडियात मुलाखती देत माझ्याच कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा दावा केला. अशी बातमी पसरली जावी याची मला कीव वाटते. मुळात आम्ही आमची भूमिका नेहमीच स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कुणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होत आहे की या समाजकंटकांचा हेतू समाजात अशांतता पसरवणे आहे, असा आरोप पडळकर यांनी केला.

Gopichand Padalkar : एवढा माज, एवढी मस्ती..; पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ पुन्हा घसरली

या सर्व प्रकारामागचा सूत्रधार आम्हाला माहिती आहे. कारण, तोच खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे. मी जर काल शांततेची संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडे सुद्धा शिल्लक राहिले नसते, असा इशारा पडळकर यांनी दिला. मी राज्यातल्या ओबीसी, धनगर समाजबांधवांना आवाहन करतो की आपल्याला ही लढाई शांततेत लढायची आहे. त्याची प्रतिक्रिया कुठेही हिंसा न करता आपल्याला द्यायची आहे. उद्या नागपूर अधिवेशनावर इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन पडळकर यांनी केले.

इंदापुरात नेमकं काय घडलं होतं ?

इंदापुरात काल ओबीसी एल्गार सभा पार पडल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर इंदापूरमध्येच असलेल्या मराठा आंदोलनस्थळाला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आपण या ठिकाणी का आलात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यानंतर पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी चप्पलफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओबीसी एल्गार सभेत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर काही वेळातच पडळकरांना मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ गो बॅक! घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र

Tags

follow us