Download App

Uddhav Thackeray : अरविंद केजरीवालांनंतर उद्धव ठाकरे? राणेंच्या ‘त्या’ ट्विटचा अर्थ काय..

Image Credit: letsupp

Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित (Arvind Kejriwal) मद्य घोटाळ्यात अटक केली. आता त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत झाली आहे. या घटनेने देशातील राजकारण ढवळून निघालं. आप नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. त्यांना विरोधी पक्षांची साथ मिळाली. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटले. शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले यांसारख्या विरोधी नेत्यांनी भाजपवर टीका केली. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनीही प्रत्युत्तरं दिली. या सगळ्यांत भाजप आमदार नितेश राणे यांच्या (Nitesh Rane) ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांची वाटचाल केजरीवालांच्या दिशेने सुरू आहे का अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. खरंतर नितेश राणे यांनी जे ट्विट केलं होतं. त्यात कुणांच नाव नव्हतं. परंतु, सांकेतिक शब्दांत त्यांनी बरंच काही सांगितलं होतं. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये “आज, मफलरवाला अंदर गया.. जल्दी ही.. गले के पट्टेवाला भी अंदर जाएगा.. क्रोनोलॉजी समझो भाईयों.. असे शब्द त्यांच्या ट्विटमध्ये होते. क्रोनोलॉजी म्हणजे घटनाक्रम समजून घ्या असे त्यांनी म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांना कोणत्या प्रकरणात कारवाई होणार याचा उल्लेख मात्र या ट्विटमध्ये नाही. मात्र ठाकरे कुटुंबियांमागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. आता नितेश राणे यांच्या या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराआधी विरोधी पक्षाचे नेत तुरुंगात असतील असा अर्थ या ट्विटमध्ये दडला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

follow us

वेब स्टोरीज