Download App

Samrudhi Highway Accident : ‘देवेंद्रवासी’ म्हणत मृतांची चेष्टा योग्य? पवार साहेबांच्या शब्दांत निकष लावला तर… भाजपचं टीकास्त्र

Samrudhi Highway Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. तसेच यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील होत आहे. त्यात : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले. यावेळी जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्रवासी होतो असे लोक सांगतात, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. पवारांच्या या आरोपाला आता भाजपकडून प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ( BJP Spokesman Keshav Upadhye answered Sharad Pawar criticism on Samrudhi Highway Accident )

जळालेल्या बससोबत तरुणांच्या स्वप्नांचाही कोळसा; कुटुंबियांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

काय म्हणाले केशव उपाध्याय?

पवारांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले की, ‘अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी त्या मृतात्म्याची ‘देवेंद्रवासी’ म्हणून चेष्टा करणे कितपत योग्य? पवार साहेब, तुमच्याच शब्दांतून निकष लावायचा झाल्यास… कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याला ‘लवासा झाला’ असं म्हणायचं का? कोणाचं उत्पन्न अचानक वाढलं तर त्याने ‘वांगी लावली’ म्हणायचं का? कोणाचा विश्वासघात झाला की त्यांचा वसंतदादा झालाय असं म्हणायचं का? कोणासोबत धोका झाला तर त्यांना ‘सोनिया गांधी झाल्या’ असं म्हणायचं का? कोणाचा बाजार उठवला गेला की त्याचा ‘उद्धव ठाकरे झाला’ म्हणायचं का? कोणाची जाणीवपूर्वक घुसमट केली जात असेल तर त्याचा ‘अजित पवार झालाय’ असं म्हणायचं का? आणि सर्वात महत्वाचं… कोणी राजीनाम्याची हूल देऊन परत घेतला की, ‘शरद पवार झाला’ असं म्हणायचं का?’ असा सवाल करत केशव उपाध्यांनी टीका केला आहे.

रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारं रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? ते कशामुळं होतं? जाणून घ्या.

काय म्हणाले शरद पवार?

समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात हे गेले काही महिने बघायला मिळतं. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात.जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्रवासी होतो असे लोक सांगतात. अपघाताचे कारण रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केलं, ज्यांनी रस्ता तयार केला त्यांना लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले, असे पवार म्हणाले. तसेच 5 लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी आणि अपघाताची कारणे सांगावी, असेही ते म्हणाले. तसेच या रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत. हा सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे याचा नीट अभ्यास होणं गरजेचं आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us