Rajyasabha Election News : राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) बिनविरोध होणार असल्याचं समोर येत आहे. कारण भाजपकडून चौथा उमेदवार देण्यात येणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आत्तापर्यंत तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर शिवसेनेकडूनही राज्यसभेसाठी एका उमदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिलेदार अद्याप ठरलेला नाही.
पेटीएमला मोठा धक्का: पेटीएम पेमेंट्स बँकेची ईडीकडून चौकशी, शेअर्समध्ये घसरण
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्याचे महत्वाचे नेते अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. चव्हाणांसोबतच मेधा कुलकर्णी पुण्यात आमदार होत्या. कुलकर्णी भाजपच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांनी त्याचं आयुष्य पक्षासाठी घालवलं आहे. त्यामुळे पक्षसंघटनेत कांम करणाऱ्यांना संधी मिळत आहे. त्यांचं अभिनंदन असून भाजपचे तीन खासदार आणि महायुतीचे इतर दोन खासदार राज्याचे प्रश्न संसदेत मांडतील खासदार हा मला विश्वास असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
अभिनयात हिरो पण, राजकारणात झिरो; सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा लोकसभेत ‘गपगार’
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि नूकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून अद्याप चौथ्या जागेसाठी सस्पेन्स ठेवण्यात आला होता. अखेर हा सस्पेन्स आता हटला आहे कारण चौथ्याजागेसाठी भाजप उमेदवार देणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केलं आहे.
व्हॅलेंटाईन्स डे विशेष : रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अनेक आमदारांसह खासदारांनी अजित पवार गटाचं नेतृत्व मान्य केल्याचं पाहायला मिळालं. आता महायुतीमध्ये असताना राष्ट्रवादीला राज्यसभेची एक जागा देण्यात आली आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार, परांजपे, नवाब मलिक, बाबा सिद्धिकींसह, समीर भुजबळ, अशी नेतेमंडळी इच्छूक आहेत.