Sharad Pawar : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना (Ajit Pawar) असुरक्षित वाटत होतं. तसेच शरद पवारांची ही स्थिती का झाली याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्ला त्यांनी शरद पवार यांना दिला. राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, शरद पवारांवर ही वेळ आली आहे. यावर मला जास्त व्यक्त होता येणार नाही. मात्र शरद पवार यांची ही स्थिती का झाली, जयंत पाटील यांची ही स्थिती का झाली. आज त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे. असं कशामुळे झालं याचा विचार त्यांनी केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही काही वेगळं नाही आज त्यांनाही त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे.
“मी पुण्याचा सहपालकमंत्री; आढावा बैठक घेणारच” : अजितदादांचाच डाव चंद्रकांतदादा त्यांच्यावरच खेळणार
अडीच वर्षांपूर्वी हेच सत्तेत होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र आमचाच असे म्हणत होते परंतु,आज मात्र त्यांच्यावर आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. आम्ही ज्यावेळी सत्तेत नव्हतो तेव्हा आत्मपरिक्षण केलं. आता तसंच आत्मपरिक्षण करण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली आहे. शरद पवार यांचं राजकीय आयुष्य इतकं मोठं असतानाही आज त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
तुमच्या हातात पक्ष किंवा सरकार असतं आणि सगळ्यांनाच डावलून एककल्लीपणे चालता. पण, घरात असो की बाहेर ज्यावेळी मुख्य लोक आपण करतो तेच बरोबर असे म्हणत असतील तर उद्याय मलाही बाहेर जायला वेळ लागणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होईल की लोक मलाच म्हणतील की हे योग्य नाही. त्यामुळे शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना असुरक्षि वाटत होतं. त्यांनी तसं व्यक्तही केलं होतं. आता ही स्थिती आणखी गंभीर होत जाणार असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
Uddhav Thackeray : रुग्णालयांत मृत्यूचे तांडव शिंदे मात्र ‘बॉस’ शहांच्या दरबारी; ठाकरे गटाचा घणाघात