Uddhav Thackeray : रुग्णालयांत मृत्यूचे तांडव शिंदे मात्र ‘बॉस’ शहांच्या दरबारी; ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray : रुग्णालयांत मृत्यूचे तांडव शिंदे मात्र ‘बॉस’ शहांच्या दरबारी; ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray : राज्यातील रुग्णालयांत रुग्णांचे (Naned Hospital Deaths) मृत्यू झाले. या घटनेवरून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारवर कठोर टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काल पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करण्यात आले आहे. सरकारी दवाखान्यांना स्मशानकळा आलेली असताना मुख्यमंत्री कुठे आहेत, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. वाघनखे येतील पण, दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसलेत. कोविड काळात गंगेत प्रेते तरंगत होती तशी प्रेते आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पडली आहेत. पण, आपले स्वाभिमानी की काय ते मुख्यमंत्री कुठे आहेत, दिल्लीत काय करत आहेत असे टोचणारे सवाल या लेखात केले आहेत.

‘दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळं राज्याची अधोगती’; सुप्रिया सुळेंचा मुळावरच घाव

नक्षलवादाचा मुकाबला करण्यासंदर्भात एक बैठक गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत बोलावली. त्या बैठकीसाठी शिंदे एक दिवस आधीच दिल्लीत पोहोचले. राज्यात सरकारी रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरू असताना मुख्यमंत्री त्यांचे बॉस अमित शहा यांच्या दरबारी वार लावून बसले आहेत. नक्षलवादाचा विषय गंभीर आहेच, पण सरकारी इस्पितळांतील बळी त्यापेक्षा जास्त चिंतेचा विषय आहे. शिंदे हे अनेक वर्षांपासून गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषवत आहेत. या पालकमंत्री पदाचा व नक्षलवाद्यांची काहीएक संबंध नसून गडचिरोलित माईनिंग उद्योगावर नियंत्रण रहावे व तेथील आर्थिक उलाढालीत सहभागी होता यावे यासाठी गडचिरोलीची योजना आहे. नक्षलवादाशी मुकाबला हा फक्त बहाणा आहे, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाने केली आहे.

शिंदेंच्या पायजम्याची नाडी दिल्लीच्या हातात

मुख्यमंत्री महोदयांचे बूड महाराष्ट्रात टिकत नाही व ते सतत दिल्लीला पळतात. पालकमंत्री कुणाला नेमायचे, महामंडळांचे वाटप कसे करायचे, असे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री उठसूट दिल्ली वाऱ्या करतात. स्वाभिमानासाठी पक्षत्याग करणाऱ्यांचे हे हाल सुरू आहेत. दिल्लीने ऊठ म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पायजम्याची नाडी दिल्लीच्या हातात आहे. त्यामुळे शिवसेना या महाराष्ट्र अभिमानी पक्षाचे नाव त्यांनी धुळीस मिळवले.

Ashok Chavan : ‘नांदेड घटनेला चव्हाणच जबाबदार’ म्हणणाऱ्यांचा वचपा काढला; मुश्रीफांसह शिंदेंनाही घेरलं

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube