‘दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळं राज्याची अधोगती’; सुप्रिया सुळेंचा मुळावरच घाव

‘दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळं राज्याची अधोगती’; सुप्रिया सुळेंचा मुळावरच घाव

Supriya Sule On BJP : दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपच्या मुळावरच घाव घातला आहे. बारामतीमधील माळेगावमधून सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यावरुन भाजपवर चांगलाच हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं आहे.

नागराज मंजुळेचा दिवाळीत धमाका! ‘नाळ 2’ येणार; सोशल मीडियावर केली चित्रपटाची घोषणा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पूर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पूर्ण विरोधाभास असून या भाजपला आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जनता नाकारणार आहे. दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह अनेक राज्यात फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

राहुल गांधींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’; पटोलेंचा भाजपला इशारा

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष बळी पडला. मात्र, आम्ही ‘इंडिया’वाले भाजपच्याविरुद्ध लढणार आणि जिंकरणार देखील”, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Reservation : केंद्राचा मोठा निर्णय; आता कंत्राटी नोकऱ्यांमध्येही मिळणार आरक्षण

सुनावणीवर भाष्य :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगातील सुनावणी आगोदरच आम्हाला चिन्ह व पक्ष मिळणार असे आमच्यातून निघून गेलेले नेते मंडळी बोलून दाखवितात. त्यामुळेच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्रपणे सुप्रिम कार्टात आमच्यातून बाजूला गेलेल्यांविरुद्ध अपिल केलं असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भाजपची रणनिती ही संविधान टिकण्याच्या दृष्टीने धोकादायक असून भाजपचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात एक अशी भूमिका घेत आहेत. मराठा, धनगर अरक्षणाचे मुद्दे मागे राहिले. महिला विधायक मंजूर करून महिलांना बेरर चेक दाखविला खरा, पण त्या चेकवर दिनांक टाकली नाही. त्यामुळे दिल्ली वगळता देशात कोठेही महिलांकडून या मंजूर विधायकाबाबत स्वागत अथवा जल्लोश झाला नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

“बारामती लोकसभा मतदारसंघात गेली १५ वर्षे प्रमाणिक काम केले. या मतदारसंघाने मला संसदेमध्ये पाठविल्य़ानंतर इतके चांगले काम केले. आजवर या मतदारसंघात प्रत्येक आमदाराला विश्वासात घेऊन आणि प्रोटोकाल धरून काम केले. त्यामुळे लोकांमध्ये माझे विश्वासाचे नाते तयार झाले आहे. येत्या काळात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असून या कामाच्या जोरावर बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारही

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube