Breaking News : शरद पवारांना धक्का ! आणखी तीन आमदार अजितदादांच्या गळाला ?

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. पक्ष व चिन्ह मिळविण्यासाठी, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठी अजित पवार हे आपल्याकडे आमदार खेचत आहेत. जावई आत […]

Letsupp Image   2023 07 05T173654.640

sharad pawar ajit Pawar

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. पक्ष व चिन्ह मिळविण्यासाठी, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठी अजित पवार हे आपल्याकडे आमदार खेचत आहेत.

जावई आत येत असताना घरच्यांना परकेपणा वाटू नये ; सदाभाऊ खोतांचा भाजपला खोचक सवाल

माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुण्याचे आमदार चेतन तुपे, सुनील भुसारा या तिन्ही आमदारांनी गुरुवारी रात्री अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे आमदार अजित पवारांबरोबर जाण्याची शक्यता आहे. अद्याप या आमदारांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे तिन्ही आमदार हे काल शरद पवार यांच्याबरोबर होते. मुंबईत मेळाव्याला उपस्थित होते. परंतु गुरुवारी रात्री तिन्ही आमदार हे अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेले आहेत. अनेक आमदारांनी आपल्या भूमिका बदलल्या आहेत. तर काही आमदार संभ्रम अवस्थेत आहेत.


भाजपला पाठिंबा देताच हसन मुश्रीफांना ईडी कारवाईबाबत मोठा दिलासा…

नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, नाशिकमधील आमदार सरोज अहिरे व मुंबईतील नवाल मलिक यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. अजित पवार गटाकडे ३५ आमदार आहेत. तर शरद पवार गटाकडे अठरा आमदारांची संख्याबळ आहे. अजित पवार गटाने आपल्याकडे चाळीस आमदार असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांकडे संख्याबळ नसल्याचा दावा केला आहे.

Exit mobile version