Download App

प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाची उपराष्ट्रपतींकडे मागणी

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar vs Sharad Pawar Group : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडून दोन गट पडले. सध्या अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी संघर्ष सुरू आहे. या वादाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. अशातच आता शरद पवार गटाने प्रफुल्ल पटे (Praful Patel) यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणी केली. त्यामुळं पटेलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.

सरकारी काम अन् अर्धा तास थांब भोवलं; न्यायालयाने पोलिसांना दिली ‘ही’ शिक्षा 

काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी दिग्गज नेतेही सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. अजित पवार गटाने सुप्रिया सुळेंची खासदारकी रद्द करा, अशी मागणी गेली होती. दरम्यानच्या काळात दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये काही गाठीभेटी झाल्या. शिवाय अलीकडेच अजित पवार यांनी आधी शरद पवार यांची प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळं राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी अटकळ बांधली जात होती. पण, तसं झालं नाही. आता शरद पवार गट आक्रमक झाला.

चक्का जाम होणार! ‘पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनाला या’ : ऊसदरासाठी राजू शेट्टी ठाम 

शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट घेतली. चार महिन्यांपूर्वी पक्षविरोधी कारवायांसाठी दहाव्या अनुसूचीनुसार कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोणतीही कार्यवाही न झाल्याने शरद पवार गटाने ही भेट घेतल्याचे मानले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा या शिष्टमंडळात सहभागी होता.

याआधी खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी पत्राद्वारे स्मरणपत्र दिले होते. मात्र, त्यांनी दिल्या पत्रावर कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं ही भेट घेतली. या भेटीत पटेलांची खासरकी रद्द करावी, बाबत धनकड यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना प्रफुल्ल पटेल नेहमी शरद पवार यांच्यासोबत दिसत होते. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी शरद पवार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करायचे. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं शरद पवार गटानं त्यांची खासदारकी रद्द करण्यचाी मागणी केली. त्यामुळं आता धनगड काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

Tags

follow us

वेब स्टोरीज