Download App

‘अजितदादा अन् शिंदेंचे उमेदवार ‘कमळावर’च लढणार’; बच्चू कडू यांचा मोठा दावा

Bachhu Kadu News : भाजप सर्वच जागा लढणार असून अजितदादा (Ajit pawar) आणि शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार कमळ चिन्हावरच लढणार असल्याचा मोठा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यातच काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा पार पडला. त्यावर बोलताना कडू यांनी दावा केला आहे.

‘मविआ’च्या बैठकीआधीच प्रकाश आंबेडकरांचा ‘खो’; 15 जागांचा उल्लेख करत सांगितला ‘तिढा’

बच्चू कडू म्हणाले, आमची राजकीय बांधिलकी कोणासोबतच नाही. महाराष्ट्रात सगळ्याच जागा भाजप लढू शकतो. एकनाथ शिंदे गटाचे आणि अजित दादा गटाचे उमेदवार राहतील. पण चिन्ह कमळ राहणार आहे. शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे. तुम्ही जर त्यांना काखीत दाबून ठेवल तर बिचवा काढायची वेळ आली नाही पाहिजे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही. आमची मानसिकता विधानसभेची फक्त अमरावती किंवा अकोलामध्ये निवडणूक लढणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

बारामतीत कोणी दहशतीचे राजकारण करत असेल तर मला सांगा, युगेंद्र पवारांनी दंड थोपटले

तसेच खासदार नवनीत राणा धमकी प्रकरणीही बच्चू कडू यांनी थेट भाष्य केलं आहे. कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम असून नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानमधून ओढून आणलं पाहिजे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून नवनीत राणांना धमकी येत असेल तर मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दरम्यान, मोदींच्या सरकारमधील खासदाराला जर धमकीत असेल तर मग कायदा कुठे राहिला? निवडणुका आहे म्हणून एका धर्माला टार्गेट केलं जातं. निवडणुका जवळ आहे तर हिरवा येईल भगवा येईल निळा झेंडा बाहेर येईल असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

follow us