Download App

तुमचं जेवढ आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण; भुजबळांनी पिळले राऊतांचे कान

  • Written By: Last Updated:

Chagan Bhujbal On Samana Editorial And Sanjay Raut : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे. यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. सामनातील या अग्रलेखावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

boat Accident : केरळमध्ये भयावह दुर्घटना, पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू

तुमचं जेवढ आयुष्य आहे, तेवढं शरद पवारांच राजकारण असल्याचे म्हणत भुजबळांनी राऊतांचे कान पिळले आहेत. शरद पवारांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हणाले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतरही संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे त्यांना काय अडचण आहे ? असा सवाल यावेळी भुजबळांनी उपस्थित केला आहे.

तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

त्यांना अस वाटत का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. राष्ट्रवादीमध्येसुद्धा अजित पवार, सुप्रिया सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते त्यांनाच माहिती. इतकं लक्ष त्यांनी शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅग वर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

Video : माजी पंतप्रधान देवेगौडांशी नाथाभाऊंचं सख्य जुळलं कसं?

कर्नाटक निवडणुकांवर केले भाष्य

यावेळी बोलताना भुजबळांनी उद्या होणाऱ्या कर्नाटकातील निवडणुकांवरही भाष्य केले आहे. सध्या ‘द केरळा स्ट्रोरी’ हा चित्रपटावर सर्वच स्तरातून चर्चा केली जात आहे. यावरून अनेक पक्षांकडून आरोपप्रत्यारोपही केले जात आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, धार्मिक आणि विषारी प्रचार जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर या पूर्वी बंदी घालण्याची मागणी झाली आहे. पण आता कोणी किती विषारी प्रचार करत आहे हे मला माहीत नाही.. या चित्रपटात चुकीचे दाखवण्यात आले आहे. पण मला फारशी माहिती नाही. पण समाजात आणि धर्माधर्मात निर्माण होईल अशा गोष्टी टाळल्या जाव्या असे ते म्हणाले.

Video : ‘लोक माझे सांगाती’ च्या दुसऱ्या आवृत्तीत आहे तरी काय?

Tags

follow us