Sambhajiraje Chatrapati : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj Statue) स्मारकाच्या मुद्द्यावरुन समुद्रात ताफा नेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला समुद्रात ताफा नेणारा मी पहिला असल्याचं मोठं विधान स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी केलंय. संपादक योगेश कुटे यांनी लेटस्अप मराठीच्या लेटस्अप चर्चा या विशेष कार्यक्रमात संभाजीराजेंनी मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
निलंगा येथे उद्या महायुतीची आशीर्वाद सभा; हजारोंच्या साक्षीने आ.निलंगेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी अरबी समुद्रात शिवस्मारकाचं पूजन केलं होतं. त्यावेळी मीदेखील उपस्थिती होतो. त्यानंतर गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं. पटेलांच्या पुतळ्यासाठी जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार शिवरायांच्या स्मारकासाठी का घेतला नाही? शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन मी समुद्रात ताफा घेऊन जात आंदोलन केलं, तिथूनच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलंय.
राज्याला लवकरच एक उमदा नेता मिळणार…राहुरीत तनपुरेंनी फोडला प्रचाराचा नारळ; भाच्यासाठी मामा मैदानात
आत्तापर्यंत एकाही राजकीय नेत्याला समुद्रात ताफा घेऊन जाणं आणि आंदोलन करणं हे जमलेलं नाही. मी पहिला असेल की ज्याने शिवस्मारकासाठी ताफा घेऊन समुद्रात आंदोलन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मारकाच्या जलपूजनासाठी आले होते, मग आता स्मारकाचा खेळ का झाला आहे? असा थेट सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी केलायं.
शंकर जगताप मुलासारखेच…1 लाखांच्या लीडने विजयी होणार ; अश्विनी जगताप प्रचारासाठी मैदानात उतरल्या
संभाजीराजे यांनी राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं असून ते म्हणाले, राज्यात सध्या गढूळ परिस्थिती आहे, त्यामुळे लोकं गोंधळून गेले आहेत. खुर्चीसाठी नितीमत्ता बाजूला ठेऊन खुर्चीसाठीच राजकीय नेत्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन होण्यासाठी ‘महाशक्ती परिवर्तन’ ची निर्मीती झाली असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलंय.
Devendra Fadnavis : सत्ता स्थापनेसाठी कुणासोबत जाणार?, प्रचार सुरू असतानाच फडणवीसांचं मोठ वक्तव्य
दरम्यान, महाशक्ती परिवर्तन आघाडीच्यावतीने राज्यात 288 जागा लढवण्याचा आमचा निर्धार असून आत्तापर्यंत 150 जागांचं फायनल असून पुढील जागांवरही लवकरच फायनल होणार आहे. या निवडणुकीत आम्ही विस्थापितांना संधी देणार असून विस्थापितही निवडणूक लढून जिंकू शकतात, हेच दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलंय.