Download App

Chhagan Bhujbal : या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद पण निवडणुकीत तुतारी किती वाजेल सांगता नाही; भुजबळांचा टोला

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षचिन्ह अनावरणासाठी रायगडावर जाण्यावरून टोला लगावला. भुजबळ म्हणाले, पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद, पण निवडणुकीत ही तुतारी किती वाजेल सांगता येत नाही. भुजबळ माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया दिली.

Supriya Sule : बावनकुळेंच्या पोटातलं ओठांवर आलं ‘त्या’ वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी घेरलं

यावेळी भुजबळ म्हणाले की, निवडणुकीमध्ये ही तुतारी किती वाजेल याबद्दल मी काही सांगू शकत नाही. या वयामध्ये आणि शारीरिक अडचणी असताना सुद्धा शरद पवार रायगडावर गेले. हे कौतुकास्पद आहे. ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारचे चिन्ह वगैरे मिळते. त्यावेळेस असा समारंभ केला जातो. तुतारी चिन्हाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ते रायगडावर गेले होते.

Sanjay Raut : ..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ( Sharad Pawar ) पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण झालं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. त्याआधी किल्ले रायगडावर (Raigad) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. यानंतर शरद पवारांनी थेट जनतेशी संवाद साधत असताना तुतारी जनतेला प्रेरणा देणार असल्याची थेट प्रतिक्रिया दिली.

सध्याचा राज्याच्या राजकारणात संघर्ष हा वैचारिक आहे. या देशामध्ये अनेक राजे- महाराजे होऊन गेले आहेत, काही संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा हा फक्त एकच राजा होता. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज … सध्या राज्याच्या राजकारणात अनेक अडचणी वाढतील अशी शक्यता वर्तवला जात आहे. शिवछत्रपतींचे राज्य सर्व सामान्यांचे सेवा करणारे राज्य आहे. आज राज्याची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा जनतेचे राज्य यावं लागणार आहे, असं यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

follow us