Download App

शरद पवार आमचं दैवत; भुजबळ-पवारांच्या भेटीवर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया…

Chhagan Bhujbal हे जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाताना कुणाला विचारून जाण्याची आवश्यकता नाही.

Chhagan Bhujbal meet Sharad Pawar Ajit Pawar group replay : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रविवारी पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यानंतर आज ते थेट शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट होत आहे मात्र या भेटीचा नेमकं कारण काय? हे अद्याप समोर न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान शरद पवारांबाबत आमच्या मनामध्ये कोणतीही कटुता नाही. ते आमचे दैवत आहे. अशी अजित पवार गटाकडून या भेटीवर पहिली प्रक्रिया समोर आली आहे.

नोव्हाक जोकोविचचं पुन्हा एकदा स्वप्न भंगल! कार्लोस अल्काराझने पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद

या भेटीच्या चर्चेदरम्यान आता अजित पवार गटाकडून या भेटीवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी यावर बोलताना म्हटलं की, शरद पवार हे राज्यासह देशातील मोठे नेते आहेत. तसेच छगन भुजबळ हे देखील जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाताना कुणाला विचारून जाण्याची आवश्यकता नाही? राज्यात नेहमीच वेगवेगळ्या पक्षांचे नेते अशा प्रकारच्या भेटीगाठी घेत असतात.

Vishalgad Encroachment आंदोलनाला हिंसक; पोलिसांसह नागरिक जखमी, पोलिसांकडून गुन्हे दाखल

तसेच आम्ही जरी भाजपसोबत गेलो असलो तरी शरद पवारांबाबत आमच्या मनामध्ये कोणतीही कटुता नाही. ते आमचे दैवत आहे. त्यामुळे पवार आणि भुजबळ यांच्या भेटीचा वेगळा अर्थ घेण्याचं कारण नाही. आम्ही सरकारमध्ये आणि ते विरोधातच आहेत. त्याचबरोबर आपली भूमिका पटवून देण्यासाठी टीका टिप्पणी ही होतच असते. जशी टीका भुजबळांनी आरक्षणाप्रकरणी शरद पवार यांच्यावर केली. अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून आली आहे.

Hashtag Tadev Lagnam: ‘या’ दिवशी होणार बहुचर्चित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ प्रदर्शित

दरम्यान भुजबळ आणि पवारांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटांमध्ये भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यासाठीच ही भेट घेतली आहे का? असं देखील बोललं जातं आहे.

काय म्हणाले होते भुजबळ?

आरक्षणाचं भांडण मिटावं म्हणून सरकारने नुकतीच सह्याद्रीला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी येऊन मार्गदर्शन करावं, सगळं प्रकरण कसं शांत होईल. सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी येणं क्रमप्राप्त होतं. मी विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा बोललो होतो. त्यांना सांगितलं की शरद पवार यांनासुद्धा बोलवा. कारण व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र, आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षा ही होती की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी तिथे यायला हवं होतं. मात्र असं सांगितलं जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते, पण सायंकाळी ५ वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप छगन भुजबळ यांनी काल केला होता.

follow us