सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार ? उद्याच शपथविधी… राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याकडून माहिती

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्रिपदाची जागा खाली आहे, ती जागा ताबडतोब भरली जायला पाहिजे. ती जागा सुनेत्रावाहिनींच्या द्वारे भरता येईल.

Sunetra Pawar

Sunetra Pawar

Chhagan Bhujbal On DCM Post: अजित पवार यांच्या आपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेतेपद व उपमुख्यमंत्रिपद रिक्त झालंय. या दोन्ही पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे शिष्टमंडळ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले आहे. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिलेत आहे. उद्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होऊन विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल आणि लगेच उद्या शपथविधी होणार आहे.


Video : …तर सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी सोहळा पार पडेल; भुजबळांनी सांगितल्या घडामोडी

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, दादा गेले. ज्या पद्धतीने गेले आहे, त्यामुळे झोप उडाली आहे. शेवटी ही जबाबदारी कुणावर तरी द्यायची आहे. पक्ष असेल सरकार चालवायचे आहे. त्यामुळे उद्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांचा निर्णय घेतला जाणार आहे. सुनेत्रा वहिनी यांच्याकडे हे पद दिले जावे, अशी मागणी होत आहे. त्यात चूक काही नाही. उपमुख्यमंत्रिपदाची जागा खाली आहे, ती जागा ताबडतोब भरली जायला पाहिजे. ती जागा सुनेत्रावाहिनींच्या द्वारे भरता येईल.

सुनेत्रा पवार अन् परिवाराशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्रिपदावर सुनील तटकरे स्पष्टच बोलले


कदाचित उद्याच्या उद्या शपथविधी-भुजबळ

लोकं जसं ठरवतील तसं होईल. उद्या विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल. सगळं एकमत झालं, तर कदाचित उद्याच्या उद्या शपविधी सुद्धा होऊ शकतो, असे संकेत भुजबळांनी दिलेत.


शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. उद्याच शनिवारी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याचे या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिल्यानंतर लगेच शपथविधीही पार पडू शकतो. हा शपथविधी अंत्यत साध्या पद्धतीने उद्याच शनिवारी पार पडू शकतो.

Exit mobile version