Chhagan Bhujbal on Jarange Patil : आमची लोकसभेला जिंकण्याची रणनीती तयार होती. मात्र, मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषीत झाली नाही, असं मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? तुझी नियत जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल
जरांगेंचा विरोध असावा
लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो. मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनीच उमेदवारी करण्यासंदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितलं. त्यानंतर उमेदवारी घोषित होणं अपेक्षित होतं. परंतु, ती झाली नाही. खरं तर शाह यांच्या निर्णयाला विरोध करण्याचं कारण नव्हतं. मात्र, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी त्यास विरोध केला असावा अशी शंका छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
जिंकण्याची रणनीती तरार होती
मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषीत झाली नाही असा थेट तर्क भुजबळ यांनी मांडला. हे घडलं नसतं तर जिंकण्याची रणनीती तयार होती असा खुलासाही त्यांनी यावेळी बोलताना केला.
कशाला चॅलेंज देतो, गप मर ना’; मनोज जरांगेंनी भुजबळांना शेवटचं सांगितलं
मी नाराजी नव्हतो
मला उमेदवारी देऊ नका आणि दिली तर नंतर घोळ घालू नका, असं मी अगोदरच सांगितलं होतं. कारण नंतर ओबीसी समाज नाराज होईल, झालंही तसंच. त्यामुळे एक प्रकारच्या अपमानाची भावना निर्माण झाली. अर्थात, मी नाराज नव्हतो तर नाशिक येथे बसूनच सूत्र हलवत होतो असंही भुजबळ म्हणाले.